UP Train Accident : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी(दि.18) दुपारी एक मोठा रेल्वेअपघात झाला. चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे 8-10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 3-4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. धक्कादायक बाबा म्हणजे, देशात गेल्या एका वर्षात तीन मोठे रेल्वे अपघात झाले असून, त्यात 300 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
29 ऑक्टोबर 2023आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम-पलासा आणि विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर ट्रेनमध्ये समोरासमोर धडक झाली. सिग्नल बिघाड आणि मानवी चुकीमुळी ही घटना घडली. या अपघातात 11 जणांना जीव गमवावा लागला होता.
17 जून 2024सियालदह-अगरतळा कांचनजंगा एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील रंगपाणी स्टेशनजवळ मालगाडीला धडकली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले होते.
2 जून 20232 जून 2023 रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात तीन गाड्यांची टक्कर झाली. कोरोमंडल एक्स्प्रेसने उभ्या असलेल्या मालगाडीला आणि नंतर दुसऱ्या बाजूने येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातात सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला होता.