पाकिस्तानी महिला सीमा हैदर पाकिस्तान सोडून प्रियकरासाठी भारतात आली आहे. आता सीमा हैदर संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सीमा हैदरला पुढील चौकशीसाठी यूपी एटीएसने ताब्यात आले आहे. पाकिस्तानातून दुबईमार्गे भारतात आल्यानंतर ती यूपीतील ग्रेटर नोएडा येथे प्रियकर सचिनसोबत राहत होती. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या संशयास्पद हालचालिंमुळे तिला यूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांनीही सीमा हैदरवर प्रश्न उपस्थित केला आहे.
सीमा आणि सचिनला चौकशीसाठी ATS ने घेतले ताब्यात; आता समोर येणार सत्य...
एटीएसने 'या' सहा मुद्द्यांमुळे चौकशी सुरू केली
न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर सीमा गुलाम हैदर आणि तिचा प्रियकर सचिन ज्या पद्धतीने माध्यमांशी बोलत आहेत ते सामान्य नाही. एखाद्या देशाची सीमा ओलांडणे इतके सोपे नाही.
पाचवी पास सीमा गुलाम हैदर ही ऑनलाइन गेम PUBG खूप छान खेळायची. गेममध्ये तिने मारिया खानच्या नावाने एक आयडी तयार केला होता. सीमा हैदर खेळातील बारकावे समजून घेण्याइतकी हुशार आहे का? तिने तिचे नाव का बदलले?
१० दिवस भारतात असताना सीमाने शुद्ध हिंदी आणि इंग्रजी शब्द बोलायला सुरुवात केली. सीमाजवळील अनेक पासपोर्ट आणि मोबाईल फोन, बनावट कागदपत्रेही तिला संशयास्पद बनवतात.
सीमा स्वतःचे वय फक्त ३० वर्ष आहे, तर पाकिस्तानमधील व्हायरल डॉक्युमेंटमध्ये तिची जन्मतारीख १९९० पूर्वीची आहे. हे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे .
सीमा हैदर हिच्या गेल्या दोन आठवड्यातील कामांचा विचार करा. सीमा हैदर अचानक बातम्यांमध्ये समोर आली. मग ती पकडली गेली. जामिनावर बाहेर आल्यावर ती मीडियाला सेलिब्रिटीप्रमाणे मुलाखती देत आहे.
उर्दू बोलणारी सीमा अचानक शुद्ध हिंदी बोलू लागते. हिंदू संस्कृतीत मिसळून जाते. एवढ्या कमी वेळात दिसणारा बदल हा संशय घ्यायला पुरेसा आहे.
सीमा हैदरच्या प्रत्येक वक्तव्याचे आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीचेही एटीएस चौकशी करत आहे. सीमा हैदर पाकिस्तानातील कराचीहून दुबईला गेली, त्यानंतर नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. पाकिस्तानातून भारतात येताना ती कोणाच्या संपर्कात आली आणि सीमाला कोणी मदत केली याचा शोध घेण्याचा एटीएस प्रयत्न करत आहे. तिच्याकडे किती मोबाईल फोन आणि मोबाईल नंबर आहेत. सीमाच्या पतीने पाकिस्तानात ज्या प्रकारे दावे केले आहेत, त्यात किती ताकद आहे. एटीएसच्या तपासात तफावत आढळल्यास सीमालाही अटक होऊ शकते.