नवी दिल्ली - बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत काहीही काम झालेले नाही. बिहार जिखे होते तिथेच आजही आहे, अशी टीका कुशवाहा यांनी केली.'' कुशवाह हे मोदी सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळत होते. यावेळी एनडीएमध्ये होत असलेली आपली घुसमटही स्पष्टपणे बोलून दाखवली. ''एनडीएमधील माझा अनुभव अत्यंत वाईट आहे. बिहारमधील जनतेला न्याय मिळावा यासाठी मी एनडीएच्या बैठकीत माझे मत वारंवार मांडले. मात्र नितीश कुमार बिहारी जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते.'' असे कुशवाह म्हणाले. तसेच राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे, तसेच हे काम भाजपाने सुरू केले आहे. असा आरोप कुशवाह यांनी केला.
नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 3:01 PM
बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ठळक मुद्देबिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, मला आणि माझ्या पक्षाला संपवणे हाच त्यांच्या अजेंडा आहे