लखनऊ: सीमेवरील तणाव दिवसागणिक वाढत असल्यानं देशभरात चीनविरोधात संतापाचं वातावरण आहे. वारंवार कुरघोड्या ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी आता केंद्रासह विविध राज्य सरकारांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं (यूपीएमआरसी) तांत्रिक कारणांमुळे कानपूर, आग्रा मेट्रोसाठी चिनी कंपनीकडून आलेली निविदा रद्द केली आहे. यूपीएमआरसीनं मेट्रोचं कंत्राट बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला दिलं आहे. त्यामुळे मेट्रो ट्रेन्सचे डबे पुरवण्याचं काम बॉम्बार्डियर करेल. याशिवाय ट्रेनचं नियंत्रण आणि सिग्नलिंग यंत्रणेची जबाबदारीदेखील याच कंपनीकडे असेल.कानपूर, आग्रा मेट्रोसाठी सीआरआरसी (CRRC) नॅनजिंग पुजहेन लिमिटेडनंदेखील निविदा भरली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे कंपनीची निविदा रद्द करण्यात आली. बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्ट इंडिया कंपन्यांचा समूह असून त्यांना कानपूर, आग्रा मेट्रोचं कंत्राट देण्यात आलं आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या एकूण ६७ मेट्रो बॉम्बार्डियरकडून पुरवल्या जातील. यातील ३९ ट्रेन कानपूर, तर २८ ट्रेन आग्र्यात धावतील. प्रत्येक ट्रेनला ३ डबे असतील. एका मेट्रोची प्रवासी क्षमता साधारणत: ९८० असेल. प्रत्येक डब्यातून जवळपास ३१५ ते ३५० जण प्रवास करू शकतील. मेट्रोचे डबे आणि सिग्नलिंग यंत्रणा यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांदेखील बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार ४ आंतराष्ट्रीय कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यांच्याकडून लावण्यात आलेल्या बोलींचा विचार करता तीन निविदांची निवड करण्यात आली. यातील सर्वात कमी बोली बॉम्बार्डियर ट्रान्सपोर्ट इंडियाकडून लावण्यात आली होती. त्यामुळे त्यांना प्रकल्पाचं कंत्राट देण्यात आलं.शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणारविस्तारवादाचा काळ संपला; भारतीय सीमेवरून पंतप्रधान मोदी यांनी चीनला दिला सज्जड इशारामोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया
India China FaceOff: आणखी एक दणका! आता मेट्रो प्रकल्पातून 'चिनी कम'; ड्रॅगनला जोरदार धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 12:37 PM