काँग्रेस नेता सलमान खानच्या मृत्यूवरुन गोंधळ; कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांच्या गाड्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:41 PM2023-11-17T16:41:50+5:302023-11-17T17:27:21+5:30

काँग्रेसने भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार अरविंद पटेरिया यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.

uproar ovdeath of congress leader salman khan after being crushed by car in rajnaer gar chhatarpur | काँग्रेस नेता सलमान खानच्या मृत्यूवरुन गोंधळ; कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांच्या गाड्या फोडल्या

काँग्रेस नेता सलमान खानच्या मृत्यूवरुन गोंधळ; कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांच्या गाड्या फोडल्या

छतरपूर जिल्ह्यातील राजनगर विधानसभा मतदारसंघातील लवकुश नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते सलमान खान यांचा कारने चिरडल्यामुळे मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या लोकांनी भाजपा नेत्यांच्या वाहनांवर दगडफेक केली. लोकांनी लाठ्या-काठ्यांनी गाड्यांच्या काचा फोडल्या. गोंधळ, दगडफेक होत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

राजनगर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हा काँग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष कुंवर विक्रम सिंह नाती राजा यांचे समर्थक सलमान खान यांच्या मृत्यूमुळे राजकारण तापलं आहे. काँग्रेसने भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार अरविंद पटेरिया यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.

मतदान संपल्यानंतर रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. तेव्हा विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार कुंवर विक्रम सिंह नाती राजा आणि भाजपाचे उमेदवार अरविंद पटेरिया यांच्या समर्थकांमध्ये तोरिया टेकजवळ वाद झाला. वाद थोडा कमी झाल्यावर दोन्ही पक्षांची वाहने पुढे सरकली.

काँग्रेसचे उमेदवार कुंवर विक्रम सिंह नाती राजा यांनी आरोप केला की, मी माझे सहकारी आणि जिल्हा काँग्रेस स्पोर्ट्स सेल अध्यक्ष सलमान खान यांच्यासोबत खाली उतरलो. तेवढ्यात मागून येणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांच्या वाहनांचा आवाज आला, मी धावत पुन्हा गाडीत बसलो. मात्र सलमान कारमध्ये बसू शकले नाहीत आणि मागून येणाऱ्या एका कारने त्यांना चिरडलं. भाजपाचे उमेदवार अरविंद पटेरिया रात्रीच्या वेळी पैसे वाटून घेत असल्याचा आरोपही काँग्रेसच्या उमेदवाराने केला आहे. 
 

 

Web Title: uproar ovdeath of congress leader salman khan after being crushed by car in rajnaer gar chhatarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.