- संजय शर्मानवी दिल्ली - नवीन संसदेतसंसद कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला असून, यावरून गदारोळ उठला आहे. संसदेच्या काही कर्मचाऱ्यांना गणवेशाचे आठ तर राज्यसभेच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कसाबसा एकच गणवेश मिळाला आहे. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी गणवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नवीन संसद भवनात नवीन ड्रेसकोड व संसद कर्मचाऱ्यांना नवीन गणवेशासह प्रवेश करायचा आहे. परंतु आतापर्यंत सर्वांना ते मिळू शकलेले नाहीत. नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी अनेक बदल करण्यात आले आहेत. यात संसदेतील कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन संसद भवनाचे नियम व प्रोटोकॉलही वेगळे तयार करण्यात आले आहेत. तीन दिवसांनी संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. परंतु आतापर्यंत अनेक संसद कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी नवीन गणवेशाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.
विरोधक संसदेत मुद्दा उपस्थित करणारसंसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचे फूल व खाकी पँट देण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांना मोठा मुद्दा मिळाला आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकारला इतर कोणते डिझाईन मिळाले नाही का?