केंद्रीय लोकसेवा आयोगाने NDA निकाल 2 जाहीर केला आहे. नॅशनल डिफेन्स एकॅडमीमध्ये भरतीसाठी या परीक्षेचा निकाल upsc.gov.in वर तपासता येईल. हरियाणाचा अनुराग सांगवान UPSC NDA 2023 परीक्षेत अव्वल ठरला आहे.
UPSC च्या इतर स्पर्धा परीक्षांप्रमाणे NDA परीक्षा देखील खूप कठीण आहे. हरियाणाच्या चरखी दादरी गावातील रहिवासी असलेल्या अनुराग सांगवानने अव्वल स्थान मिळवून आपल्या छोट्या गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. सुमारे अडीच लाख उमेदवारांपैकी अनुराग सांगवान याने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुरागचे वडील जीवक सांगवान गुरुग्राममध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करतात आणि आई सुदेश देवी शिक्षिका आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी ते गाव सोडून गेले होते. अनुरागच्या यशाने जीवक खूप खूश आहे. त्यांनी मीडिया मुलाखतीत सांगितले की अनुरागने आयआयएससी बंगलोर स्पर्धा परीक्षेत 250 वा रँक मिळवला आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर उन्नीकृष्णन यांना अनुराग आपला आदर्श मानतो प्रतिकूल परिस्थितीतही तो आपल्या कर्तव्यापासून मागे हटला नाही. अनुराग सांगवान म्हणतो की, मेहनतीची जागा दुसरं काहीही घेऊ शकत नाही. यशस्वी लष्करी अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"