शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

यूपीएससीचा निकाल- टीना दाबी देशातून अव्वल, योगेश कुंभेजकर महाराष्ट्रातून पहिला

By admin | Published: May 10, 2016 5:27 PM

या परीक्षेत टीना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर योगेश कुंभेजकर हा महाराष्ट्रातून अव्वल आला आहे

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत टीना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर योगेश कुंभेजकर हा महाराष्ट्रातून अव्वल आला आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2015च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत दिल्लीतल्या टिना दाबी हिनं पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर योगेश कुंभजेकर हा महाराष्ट्रातून अव्वल आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल  www.upsc.gov.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला जवळपास 1,078 विद्यार्थी बसले होते. यातील 499 विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील होते. तर 314 जण हे मागास वर्गीयांतून परीक्षेला बसले होते. 176 अनुसूचित जातीतून तर 89 अनुसूचित जमातीतून परीक्षेला बसले होते. या परीक्षेत जम्मू-काश्मीरमधला अथर आमीर उल साफी खान या दुसरा आला. जसमीत सिंग सिंधू तिसरी आली आहे. आयोगानं 172 जणांची यादी आरक्षित केल्याची माहिती दिली आहे. हा निकाल 2015ला झालेल्या लेखी परीक्षेच्या निकषांवर लावला असल्याचीही माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना अनेक सरकारी सेवेतील दारं खुली झाली आहेत.  सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी २७ एप्रिलपासून बोलावले जाणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर www.upsc.gov.in  व्यक्तिमत्त्व परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थ्यांची इ-पत्रे 18 एप्रिलपर्यंत टाकण्यात येणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना जर संकेतस्थळावरून व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी पत्रे मुलाखतीच्या पाच दिवस आधी डाऊनलोड करता न आल्यास त्यांनी तात्काळ आयोगाशी संबंध साधायचा आहे, असे आयोगानं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व चाचणीच्या वेळी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करावी लागणार आहेत. या कागदपत्रांमध्ये वयाचा दाखला, शैक्षणिक पात्रता, अपंगत्व असल्यास तशी कागदपत्रे, साक्षांकित अर्ज, टीए अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी ही कागदपत्रे मुलाखतीला येताना सोबत आणावीत, यूपीएससनीनं सांगितले आहेत. 
 
यूपीएससी परीक्षेतील महाराष्ट्रातले गुणवंत
 
योगेश कुंबेजकर 8
सौरभ गहरवार 46
हनुमंत झेंडगे 50
विशु महाजन 70
निखिल पाठक 107
स्वप्नील वानखडे 132
स्वप्नील खरे 197
राहुल पांडवे 200
नवनाथ गव्हाणे 220
हर्षल भोयर 233
मुकुल कुलकर्णी 238
रोहित गोडके 257
अक्षय कोंडे 278
रवींद्र खटाळे 283
आशिष काटे 328
पंकज खंडागळे 340
अक्षय पाटील 344
संजीव चेथुले 354
दत्तात्रेय शिंदे 377
विवेक भस्मे 395
श्रीकांत सुसे 400
रेहा जोशी 425
वासुद तोरसेकर 440
कपिल गाडे 455
संदीप भोसले 482
स्वप्निल पुंडकर 487
शिबी गहरवार 489
अमित आसरे 490
अदिती वाळुंज 491
पुनम पाटे 497
तुषार वाघ 545
देवयानी हलके 576
प्रसाद मेनकुंदळे 599
प्रवीण डोंगरे 601
आकाश वानखडे 603
किरणकुमार जाधव 614
किरण शिंदे 618
ऋषिकेश खिल्लारी 627
शरदचंद्र पवार 632
गोपाल चौधरी 635
कुलदीप सोनवणे 636
विशाल नरवडे 640
पवन बनसोड 674
शशांक शेव्हरे 682
श्रुती शेजोळे 690
स्वप्निल कोठवडे 693
राहुल तिरसे 705
विनोदकुमार येरणे 709
रामदास काळे 711
स्वप्नील महाजन 720
नितीश पाठोडे 723
रोहन आगवणे 735
समीर पाटील 746
लक्ष्मीकांत सुर्यवंशी 750
प्रांजल पाटील 773
संदीप साठे 775
विक्रम विरकर 784
जय वाघमारे 788
किशोर तांदळे 814
शुभम ठाकरे 817
ओमकारेश्वर कांचनगिरे 820
संदीप पानदुले 826
भुषण भिरुड 829
संघमित्र खोब्रागडे 832
योगेश पाटील 836
रामदास भिसे 851
स्वप्नील चौधरी 862