अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. मेहनत करणारा प्रत्येकजण प्रत्येक चुकातून शिकत पुढे जात असतो. निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्कीच मिळते. एक-दोन परीक्षांमध्ये नापास झाल्यानंतर काही लोक निराश होतात, पण काही लोक तरीही हार मानत नाही. हरियाणातील या मुलाने 35 परीक्षांमध्ये नापास होऊनही हिंमत ठेवली.
विजय वर्धन हे सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेत वारंवार नापास झाले, पण त्यांनी हार मानली नाही. शेवटी, 35 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर, विजय वर्धन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 104 वा क्रमांक मिळवून आयएएस बनले आहेत. विजय वर्धन वारंवार अपयश येऊन देखील खचले नाहीत तर चुकांमधून शिकत राहिले.
विजय यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला, तेथील शाळेत त्याचे शिक्षण झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हिसार येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक केलं, त्यानंतर विजय वर्धन UPSC चे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले. त्यांच्या तयारीदरम्यान, ते हरियाणा पीसीएस, यूपीपीएससी, एसएससी आणि सीजीएलसह 30 परीक्षांना बसले, परंतु त्या प्रत्येकामध्ये ते नापास झाले.
2014 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली, नापास. त्यानंतर सलग चार वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयश आले. 2018 मध्ये, ते UPSC पास केल्यानंतर आणि 104 वा ऑल इंडिया रँक (AIR) मिळवून IPS झाले. IPS पदावर खूश नव्हते, म्हणून 2021 मध्ये पुन्हा UPSC ची परीक्षा दिली आणि IAS झाले.
आयएएस विजय वर्धन म्हणाले की नागरी सेवा इच्छुकांसाठी तुम्ही स्वत:च स्वत:साठी सर्वोत्तम प्रशिक्षक आहात. कोणताही निर्णय घेताना तुम्ही नेहमी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. अनेक वर्षांपासून पेपर देणाऱ्या उमेदवारांना ते म्हणाले की, ज्या टेक्निकवर तुम्ही आधीच काम करत आहात त्या टेक्निकची पुनरावृत्ती करू नका. रणनीती बदला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.