शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रेरणादायी! वडिलांच्या अंत्यसंस्कारास जाण्यासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय 'तो' झाला IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 12:11 PM

आर्थिक विवंचनेमुळे आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकाव्या लागल्या. पण त्यांनी आपल्या स्वप्नाशी तडजोड केली नाही.

देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी पदांपैकी एक असलेलं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न लाखो तरुणांचे आहे. त्यापैकी फारच कमी लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. काहींच्या संघर्षाची गोष्ट कळल्यावर कडक सॅल्यूट करावासा वाटतो. आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचीही अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. आपल्या सर्व अडचणींना मागे टाकून त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि त्यात यशही मिळविले. 

आयएएस अधिकारी रमेश घोलप यांना लहानपणी पोलिओची लागण झाली होती. लहानपणी त्यांना डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. आर्थिक विवंचनेमुळे त्यांना आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकाव्या लागल्या. पण त्यांनी आपल्या स्वप्नाशी तडजोड केली नाही. शेवटी ते जिद्दीने IAS अधिकारी झाले. IAS रमेश घोलप यांच्या वडिलांचे सायकलचे छोटेसे दुकान होते. वडिलांना दारू पिण्याची वाईट सवय होती. त्यांच्या या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आलं. 

आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकल्या

एके दिवशी वडिलांनी जास्त मद्यपान केल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर कुटुंबाचा संपूर्ण भार त्यांची आई आणि त्यांच्या खांद्यावर पडला. पोलिओग्रस्त असूनही त्यांनी आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकल्या. रमेश घोलप यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावातून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते आपल्या काकांच्या घरी गेले. वडिलांचं निधन झालं तेव्हा रमेश बारावीत शिकत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. 

कोणतही कोचिंग नाही

काकांच्या घरापासून त्यांच्या घरापर्यंत जाण्याचे भाडे फक्त 7 रुपये होते. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. बारावीनंतर रमेश घोलप यांनी डिप्लोमा केला आणि गावातील शाळेत शिक्षक झाले. मात्र, त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि बी.ए.ची पदवी पूर्ण केली. पण यूपीएससीच्या तयारीसाठी सहा महिने नोकरी सोडावी लागली. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा UPSC नागरी सेवा परीक्षा दिली. मात्र यात यश आले नाही. कोणतही कोचिंग घेतलं नाही. कठोर परिश्रमामुळे त्यांना अखेर 2012 मध्ये यश मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी