नवी दिल्ली : यूपीएससीची सेकंड टॉपर (UPSC Second Topper) जागृती अवस्थी ही अभ्यासासोबतच कुकिंगमध्ये (Cooking) अव्वल आहे. तिला विविध प्रकारचे डिश बनवणे (dishes) आणि त्यामध्ये नव-नवीन प्रयोग करून हेल्दी रेसिपी तयार करायला आवडतात. यूपीएससीच्या तयारीदरम्यान, मेंदूला आराम मिळावा म्हणून थोडा वेळ ब्रेक घेऊन अनेकदा किचनमध्ये जाऊन हेल्दी डिशेस तयार करत होती. त्यानंतर पुन्हा यूपीएससीची स्टडी करत होती. (UPSC’s second topper Jagriti Awasthi also tops in cooking, know her special dishes)
जागृती अवस्थी हिने सांगितले की, चायनीज किंवा फास्ट फूडपेक्षा हेल्दी कुकिंगची आवड आहे. यूपीएससीच्या स्टडीदरम्यान वेळ काढून किचनमध्ये जात होती. त्यानंतर किचनमध्ये हेल्दी फूड तयार करत होती. तसेच, अशा प्रकारे कुकिंग केल्याने दोन प्रकारे फायदा होतो. पहिला म्हणजे, हे स्टडीदरम्यान मूड बदलण्यास मदत करते आणि दुसरे म्हणजे, हेल्दी फूड निरोगी राहण्यास मदत करते.
जागृती अवस्थी पिठाचे मोमोज खूप छान बनवते. तिला हेल्दी कुकिंगची आवडत असल्याने ती अजिनोमोटो सारख्या चिनी पदार्थांऐवजी भारतीय मसाले घालून मोमोज बनवते. ती म्हणते की, यामुळे टेस्ट आणखी चांगली होते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यासह, ती तेलाशिवाय दही वडे देखील बनवते, जे कुटुंबातील सर्व सदस्यांना आवडते. याबाबत तिने सांगितले की, स्वत: सणांमध्ये दही वडा बनवण्याचा प्रयत्न करते, कारण त्यामध्ये तेल नसते, त्यामुळे आरोग्याला हानी होत नाही.
याचबरोबर, दक्षिण भारतीय डिश अप्पम आणि गुजराती ढोकळा देखील तिच्या खास पदार्थांमध्ये समाविष्ट आहे. याबाबत ती सांगते की, शुद्ध शाकाहारी असल्याने उत्तर भारतीयांच्या किचनमध्ये तयार होणारे सर्व प्रकारचे जेवण तयार करते. विशेष गोष्ट म्हणजे तेलकट आणि मसालेदार पदार्थ सुद्धा प्रयोग करून हेल्दी फूड तयार करते.