बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड : काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये माेठ्या प्रमाणावर लिथियमचा साठा सापडला हाेता. आता हिमाचल प्रदेशमध्ये माेठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा आढळला आहे. हमीरपूर, उना, शिमला आणि मंडी या जिल्ह्यामध्ये सुमारे ८०० टनांपेक्षा जास्त साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अणूउर्जा विभागाच्या अंतर्गत येणारी आण्विक खनिज अन्वेषण आणि संशाेधन संचालनालयाने हिमाचल प्रदेशमध्ये सर्वेक्षण केले हाेते.
युरेनियमचा वापर कशासाठी हाेताे?
- युरेनियम डायऑक्साईडचा वापर अणूउर्जेसाठी केला जाताे. अण्विक रिॲक्टरमध्ये युरेनियम आणि प्लुटाेनियम डायऑक्साईडच्या छड्या वापरल्या जातात.
- भारत समृद्ध युरेनियमसाठी इतर कॅनडा, रशिया, उझबेकिस्तान इत्यादी देशांवर अवलंबून आहे. भारतात माेठा साठा आढळल्यामुळे हे अवलंबन कमी हाेईल.