नवी दिल्ली : नाशिकहून मुंबईपर्यंत आपल्या न्याय्य हक्कांसाठी पायपीट करणाºया शेतकºयांच्या गर्दीमुळे भाजयुमोच्या राष्टÑीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांना शहरी माओवाद डोकावत असल्याचा साक्षात्कार झाला आहे. महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने केली. आपल्या मागण्यांसाठी पायपीट करीत आलेल्या गोरगरीब शेतकºयांचा हा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.महाजन म्हणाल्या, ‘दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत, महाराष्ट्रातील भाजप सरकारनेच कर्जमाफी दिली होती. आता त्यांना सरकारकडून पुन्हा काही अपेक्षा आहेत. त्या शेतकºयांच्या प्रश्नावर महाराष्टÑ सरकार उपाय काढेल. परंतु अलीकडे शहरी माओवाद हा देशभरात जास्त वाढतो आहे. महाराष्ट्रात तर शहरी माओवादाची नवी संकल्पनाच आली आहे. ती पुण्यातून सुरू झालेली आहे. ही शिकले-सवरलेल्या कम्युनिस्ट विचारांची पिढी आहे, जी आपल्या करावर चाळीशीत पीएचडी करते, ती नक्षलग्रस्त जिल्ह्यात जाऊन भरकटत आहे.
शेतकरी मोर्चातून डोकावतो शहरी माओवाद - पूनम महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:51 AM