ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद यांची मुक्तता करण्यात आली आहे. स्वामी असीमानंद यांच्यासोबत अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं आहे. सुनील जोशी ज्यांचं आधीच निधन झालं आहे त्यांच्यासोबत भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. विशेषम म्हणजे 2011 रोजी असीमानंद यांना बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणणा-या एनआयएने कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं आहे. न्यायालय आज निकाल सुनावणार असल्याने सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं.
एनआयएने या तरुणांना पुन्हा पाकिस्तानला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी त्यांना भारतीय लष्कराच्या हवाली केलं आहे. पाकिस्तानने नुकतंच भारतीय जवान चंदू चव्हाण यांची सुटका केल्याने, भारतानेया पाकिस्तानी तरुणांची सुटका करण्यात आल्याचं सरकारमधील सुत्रांकडून कळलं होतं.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार या तरुणांचे जबाब, मोबाईलची माहिती, जप्त करण्यात आलेले जीपीएस डिव्हाईस आणि इतर गोष्टींची तपासणी केली असता त्यांच्या दहशतवादी हल्ल्याचा संबंध असल्याचा कोणताच पुरावा हाती आला नसल्याचं सांगितलं आहे.
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तळ रिकामे करत सुमारे ३०० दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांचे डझनभर तळ नौशेरा व झेलम या भागात तर काही तळ स्थानिक वस्तीत हलवण्यात आल्याचे समजते.
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले.