ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25- पंतप्रधान नरोंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच असा पुनरुच्चार मोदींनी केला. जवानांवर पूर्ण विश्वास आहे, अशे सर्व हल्ले ते परतवून लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जवानांचं कौतुक करताना मोदी म्हणाले, नेत्यांना बोलण्याची सवय असते, पण जवानांना बोलण्याची नाही तर प्रत्यक्ष कृती करुन दाखवण्याची सवय असते.
‘मन की बात’मध्ये काश्मीरच्या मुद्यापासूनच मोदींनी सुरूवात केली. काश्मीरच्या लोकांना आता शांती हवी आहे, काश्मीरचे नागरिक देशविरोधी शक्तींना समजू लागलेत. शांती, एकता आणि सद्भावना हा आपल्या समस्येचा आणि विकासाचा मार्ग आहे असेही मोदी म्हणालेत. उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच त्यांची गय केली जाणार नाही असा पुनरुच्चार मोदींनी केला. यावेळी बोलताना मोदींनी पॅरालम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा केली.