नवी दिल्ली : वित्त विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या २० एप्रिलच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना पुन्हा बोलावले जाण्याची शक्यता आहे.वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील समिती एक हजार रुपये व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारी निर्णयाची छाननी करत आहे. या बैठकीत पटेल, वित्तीय बाबींचे सचिव शक्तिकांत दास व वित्तीय सेवा सचिव अंजली चिब दुग्गल यांना बोलावले जाण्याची शक्यता आहे.याआधी समितीपुढे पटेल यांनी सरकारने नोटाबंदीची सूचना केली व दुसऱ्या दिवशी रिझर्व्ह बँकेने त्यास संमती दिली असे सांगितले होते. मात्र किती बाद नोटा बँकांत जमा झाल्या याची माहिती ते देऊ शकले नव्हते. आता ती माहिती घेतली जाईल व नव्या नोटा आणल्याने स्थिती किती सुधारली, याचा आढावा घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
उर्जित पटेल पुन्हा संसदीय समितीपुढे
By admin | Published: March 24, 2017 12:31 AM