ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - ऊर्जित पटेल यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . विद्यमान गव्हरन्र रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बँकेचे उप गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
सरकारने गव्हर्नरपदासाठी निश्चित केलेल्या चार जणांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये ऊर्जित पटेल, माजी उप गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश होता. अखेर ऊर्जित यांची रघुराम राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून निवड झाली.