अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन (Antony blinken) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. यावेळी मोदी यांनी भारत-अमेरिकेदरम्यान सहकार्य मजबूत करण्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तत्पूर्वी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर(S Jayshankar) यांची भेट घेतली. यावेळी ब्लिंकन यांनी भारताला कोरोना लसीसाठी 2.5 कोटी डॉलरची मदत देण्याची घोषणा केली. (US State secretory Antony blinken annonced help of 2.5 crore dollar for corona Vaccination in India.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांना भेटून आनंद झाल्याचे म्हटले. अमेरिका आणि भारताचे सहकार्य लोकशाही मुल्यांना आकार देत आहे आणि जगाच्या भल्यासाठी एक ताकद असल्याचे म्हटले.
एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकन यांनी अमेरिका कोरोना लसीकरणासाठी भारताला 2.5 कोटी डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा केली. अमेरिकेने भारताला आधीच 2 कोटी डॉलरहून अधिक रकमेची कोरोना मदत दिली आहे. अमेरिका सरकार भारतातील लसीकरण मोहिमेला मदत करणार आहे. भारत आणि अमेरिकेतून कोरोना महामारी संपविण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही एकत्र काम करत राहू, असे ब्लिंकन म्हणाले.