ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ९ - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीही प्रसारमाध्यमे डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांना निसटती आघाडी दाखवत होती. त्यावेळी चेन्नईतील चाणक्य माशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची भविष्यवाणी केली होती. चाणक्यच्या या भविष्यवाणीला तेव्हा कोणी गांर्भीयाने घेतले नसले पण हीच चाणक्यची भविष्यवाणी आज खरी ठरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत ४५ वे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान मिळवला.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असताना चेन्नईतील चाणक्य माशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली होती. माशांच्या टँकमध्ये दोनबाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांचे दोन फोटो व बोटीची छोटी प्रतिकृती होती. यावेळी चाणक्यला खाद्य घातल्यानंतर त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोटीजवळचे खाद्य वेचले. सातवेळा चाणक्यने ट्रम्प यांच्या फोटोजवळच्या खाद्यांची निवड केली.
चीनमध्येही अशाच प्रकारे एका माकडाने डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भविष्यवाणी केली आहे. या माकडासमोर ट्रम्प आणि हिलरी क्लिंटनचे दोन मोठे पोस्टर ठेवण्यात आले होते. त्याने ट्रम्प यांच्या फोटोची निवड केली.