शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

अमेरिकेच्या अफगाणमधील उपकरणांचा काश्मिरात अतिरेक्यांकडून वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 10:44 AM

लष्कराला वायफायद्वारे जाेडता येणारी थर्मल इमेजरी उपकरणे तसेच इरिडियम सॅटेलाईट फाेनचा वापर काश्मीरमध्ये हाेत आहे. लष्कराने असे १५ संकेत पकडले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांपासून दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी या थर्मल इमेजरी उपकरणांचा वापर हाेताे.

श्रीनगर : अमेरिका व मित्रराष्ट्रांच्या सैन्याकडून अफगाणिस्तानात साेडून दिलेली अत्याधुनिक उपकरणे काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हाती लागली आहेत. अत्याधुनिक इरिडियम सॅटेलाईट फाेन तसेच रात्रीच्यावेळी सुरक्षा यंत्रणांना चकविण्यात मदत करणाऱ्या उपकरणांचा दहशतवाद्यांकडून वापर हाेत असल्याचे आढळून आले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांच्या वापरावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

लष्कराला वायफायद्वारे जाेडता येणारी थर्मल इमेजरी उपकरणे तसेच इरिडियम सॅटेलाईट फाेनचा वापर काश्मीरमध्ये हाेत आहे. लष्कराने असे १५ संकेत पकडले आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणांपासून दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी या थर्मल इमेजरी उपकरणांचा वापर हाेताे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यापासून अशा उपकरणांचा वापर हाेत असल्याचे संकेत मिळायला लागले. सुरुवातीला उत्तर काश्मीरमध्ये संकेत मिळाले हाेते. आता ते दक्षिण काश्मीरमध्येही मिळत आहेत. जवानांच्या शरीरातून उत्पन्न हाेणाऱ्या उष्णतेला थर्मल इमेजरी उपकरणे पकडतात आणि जवानांची माहिती दहशतवाद्यांना प्राप्त हाेते.

उपकरणांचा शाेध सुरूइरिडियम सॅटेलाईट फाेन व इतर उपकरणांना शाेधण्यात येत आहे. यासाठी संरक्षण गुप्तचर विभाग व राष्ट्रीय तांत्रिक संशाेधन संस्थेसारख्या संस्थांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्यानंतर या उपकरणांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये पुरवठाअशाप्रकारची उपकरणे पाकिस्तानी लष्कराकडे नाहीत. अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यापूर्वी बरेच लष्करी साहित्य तेथेच टाकून दिले हाेते. ते तालिबान्यांच्या हाती पडले आणि तेथून ते काश्मीरमधील दहशतवाद्यांना पुरविण्यात आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका