शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

अमेरिकेतील वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले; धर्मेंद्र प्रधान यांचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 4:36 PM

अमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असं अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे.

ठळक मुद्देअमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असं अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक राज्याचा स्वतंत्र महसूल वसूली विभाग असतो. त्यामुळे बॅलेन्स मॉडल असावं, जीएसटी कॉन्सिल एक बॅलन्स मॉडल तयार करत आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हंटलं आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेत आलेल्या वादळामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत, असं अजब विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत वादळ आल्यानं भारतात पेट्रोलचे दर वाढले आहेत. प्रत्येक राज्याचा स्वतंत्र महसूल वसूली विभाग असतो. त्यामुळे बॅलेन्स मॉडल असावं, जीएसटी कॉन्सिल एक बॅलन्स मॉडल तयार करत आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हंटलं आहे.

तुम्हाला जर विकास हवा असेल तर कर भरायला हवा, असंही त्यांनी म्हंटलं. देशभरात पेट्रोलवर समान कर असायला हवा, असं मत धर्मेंद्र प्रधान त्यांनी व्यक्त केलं. भाजपा शासित राज्यात कल्याणकारी योजनांवर सर्वाधिक खर्च केला जातो, असा दावा धर्मेंद्र प्रधान यांनी केला. पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या अंतर्गत आणायला हवं, असंही त्यांनी केलं होतं. दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होतील, अशी शक्यता काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं. 

दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता- धर्मेंद्र प्रधानदिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असे संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी दिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलले जातात. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढलेल्या दरांवर सर्व स्तरातून टीका होते आहे. सर्वसामान्यांबरोबरच विरोधकांकडूनही सरकारवर टीकेचा भडीमार केला जातो आहे.  सरकारच्या या धोरणावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तविली. युएसमध्ये आलेल्या पुरामुळे तेलाच्या निर्मीतील 13 टक्क्यांनी घट झाली म्हणूनच रिफायनरी तेलाच्या किंमती वाढल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. याचवेळी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्तवली.  इंधनाचे दर जीएसीटी कक्षेत येतील का? असा प्रश्न विचारला असता इंधन दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. असे झाल्यास ग्राहकांना फायदा होईल असंही धर्मेद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं.