जेव्हा जानेवारीमध्ये ईरानच्या मेजर जनरल कासिम सुलेमानीला एअरस्ट्राईकमध्ये मारण्यात आले होते तेव्हा तिसरे विश्वयुद्ध होण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. मात्र, त्यानंतर जगात एवढ्या घटना घडल्या की सुलेमानीवरील हल्ला हा त्याचाच भाग झाला आहे. सध्या हे तणावाचे केंद्र चीन आणि भारताच्या मध्यावर आल्याने विश्वयुद्ध झाल्यास कुठे होईल याबाबत जाणकारांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिका, चीन, उत्तर कोरिया, ईरान आणि चीन, भारत, जपान, तैवान अशा आघाड्यांवर मोठा तणाव सुरु आहे. या जागांवर तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी भडकण्याची शक्यता आहे. इरान आणि इस्त्रायलमध्ये तणाव मोठ्या काळापासून सुरु आहे. मध्य पूर्वेत छोट्या मोठ्य़ा सैन्य कारवाया होत आहेत. इरान गाझा, सिरीया, लेबनॉनमध्ये इस्त्रायलविरोधी ताकदींचे समर्थन करतो. तर इस्त्रायल ईरानवर हल्ले करतो. ईरानने जर अणुबॉम्ब बनविण्यास पुन्हा सुरुवात केली तर इस्त्रायलवर थेट हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे जगाच्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये मोठा फरक पडेल आणि ते देशही यामध्ये उड्या घेण्याची शक्यता आहे.
ईरानचा कमांडर सुलेमानीला अमेरिकेने मारले. सुलेमानीने इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दुतावासावर हल्ले केले होते. ईरानने अमेरिकेचे विमान समजून चूकून यूक्रेनचे प्रवासी विमान उडविले होते. यामध्ये 176 लोकांचा मृत्यू झाला होता. ईरानने ट्रम्प यांच्या अटकेचे आदेश काढले असून इंटरपोलचीही मदत मागितली आहे. यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
अमेरिका आणि तुर्कस्तानमध्ये गेल्या वर्षी तणाव वाढला होता. अमेरिकेने सिरीयाच्या बॉर्डवर तैनात अमेरिकी समर्थक गटांना हटविण्याची तयारी दाखविली होती. मात्र, नंतर नकार देत तुर्कस्तानवर प्रतिबंध घालण्याची धमकी दिली. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावर तुर्कीने आण्विक शस्त्रे बनवावीत असे अमेरिकेला वाटत असल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढू लागला आहे. या वादात शेजारी रशियाही पडण्याची शक्यता आहे.
अमेरिका-चीन आणि भारत-पाकिस्तानसध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. विश्वयुद्ध सुरु झाल्यास चीनची फूस असल्याने पाकिस्तानही भारतावर हल्ला करू शकेल. सध्या चीनने भारताला घुसखोरी करून त्रास देण्यास सुरुवात केली असताना पाकिस्तानने दुसऱ्या बाजुला सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने चीनला आवर घालण्यासाठी साऊथ चायना सीमध्ये युद्धनौका तैनात केल्या आहेत. तसेच युद्धसरावही सुरु केल्याने तिथेही तणावाचे वातावरण आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक
चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार