प्रश्न - माझा अमेरिकेचा इमिग्रंट व्हिसा मंजूर झाला आहे, पण मी अमेरिकेला जाण्याआधी माझ्या वैद्यकीय अहवालाची मुदत संपणार आहे, तरीही मी अमेरिकेला जाऊ शकतो का ?
उत्तर - वैद्यकीय अहवालाची मुदत संपल्यानंतर तुम्हाला जो व्हिसा मंजूर झालाय त्यावर तुम्ही प्रवास करु शकत नाही. तुम्हाला पुन्हा नव्याने वैद्यकीय तपासणी करुन नव्याने व्हिसा मिळवावा लागेल. इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेला जाण्यासाठी तुमच्याकडे वैध वैद्यकीय अहवाल असला पाहिजे. वैद्यकीय अहवाल त्याच्या तारखेपासून फक्त सहा महिनेच ग्राहय धरला जातो. वैद्यकीय अहवालाची मुदत संपते त्याच दिवशी तुमचा व्हिसाही संपतो.
तुम्हाला मुदतीमध्ये इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेचा प्रवास करता आला नाही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा अमेरिकेला जायचे असेल तर, तुम्हाला नव्याने तुमची वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी लागेल. कागदपत्रांमध्ये आवश्यक बदल करावे लागतील आणि ustraveldocs.com या संकेतस्थळावरुन पुन्हा मुलाखतीची वेळ घ्यावी लागेल. तुम्हाला पहिल्यांदा मंजूर झालेल्या इमिग्रंट व्हिसावर का प्रवास करता आला नाही ते, दूतावासातील अधिका-याला पटवून द्यावे लागेल, तुमची बाजू पटली तर तुम्हाला नवीन व्हिसा मंजूर केला जाईल.
आणखी वाचा