"ट्रम्प जे अमेरिकेत करतायेत, तेच काम त्यांचे मित्र मोदी भारतात करतायेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 12:41 PM2021-01-07T12:41:07+5:302021-01-07T12:46:30+5:30
digvijay singh : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत अमेरिकचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला.
या घटनेचे पडसाद जगभरात उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी भाष्य केले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जे करत आहेत, तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात करत आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या ट्विटला रिट्विट करत दिग्विजय सिंह म्हणाले, " बिल क्लिंटन, आम्ही तुमचे विचार शेअर करतो. ट्रम्प अमेरिकेत जे काय करत आहेत, तेच त्यांचे मित्र मोदी भारतात करत आहेत. भारतीय लोकांचे विभाजन आणि भारतीय राज्यघटना बिघडवण्याचा त्यांचा हेतू आहे."
We share your thoughts Mr Bill Clinton. What Trump is doing in US, his friend Modi is doing in India. He is bent upon dividing the Indian People and undermining the Indian Constitution https://t.co/MG8w9WOIg1
— digvijaya singh (@digvijaya_28) January 7, 2021
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडेन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचे कामकाज थांबवावे लागले. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्तांतर शांततेत व्हायला हवे..."
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर भाष्य केले असून हिंसाचाराच्या बातम्या पाहून आपण अस्वस्थ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदींनी ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, "वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगल आणि हिंसाचाराबाबतच्या बातम्या पाहून अस्वस्थ झाले. व्यवस्थित आणि शांततेत सत्ता हस्तांतरण व्हायला पाहिजे. बेकायदेशीर निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही."
Distressed to see news about rioting and violence in Washington DC. Orderly and peaceful transfer of power must continue. The democratic process cannot be allowed to be subverted through unlawful protests.
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2021
ट्रम्प यांचे समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा पक्षात आहोत.
ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट लॉक
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट १२ तासांसाठी, तर फेसबुकने २४ तासांसाठी लॉक केले आहे."वॉशिंग्टन डीसीमध्ये उद्भवलेल्या हिंसक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे तिन ट्वीट्स हटवावेत, अशी आमची मागणी आहे. नागरी अखंडत्व धोरणाचे वारंवार आणि गंभीर उल्लंघन त्यांनी केले आहे," असे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्स न हटवल्यास डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट लॉक राहील, असेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.
Twitter locks account of outgoing US President Donald Trump for 12 hours following removal of three of his tweets. https://t.co/EJUdTx3t49">https://t.co/EJUdTx3t49; https://t.co/jdQpJ6C3xF">pic.twitter.com/jdQpJ6C3xF
— ANI (@ANI) https://twitter.com/ANI/status/1346974501423124481?ref_src=twsrc%5Etfw">January 7, 2021
फेसबुकने हटविला ट्रम्प यांचा व्हिडीओ
ट्विटरनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ फेसबुकने डिलीट केला. दरम्यान, अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या वेळी ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. "आम्ही ट्रम्प यांचा व्हिडिओ हटविला आहे, कारण ट्रम्प यांचा व्हिडिओ सुरु असलेल्या हिंसाचार कमी करण्याऐवजी प्रोत्साहन देत होता," असे फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंटीग्रिटी गाय रोसेन यांनी म्हटले आहे.
Facebook removes US President Donald Trump's video addressing his supporters during violence at US Capitol
— ANI (@ANI) https://twitter.com/ANI/status/1346956739376148483?ref_src=twsrc%5Etfw">January 6, 2021
"We removed it because on balance we believe it contributes to rather than diminishes the risk of ongoing violence," tweets Facebook Vice President of Integrity, Guy Rosen https://t.co/fdCneDzNwq">https://t.co/fdCneDzNwq
...हा देशद्रोह आहे - जो बायडेन
नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले जो बायडेन (Joe Biden) यांनी ट्रम्प यांना संविधानाची सुरक्षा करण्याचे आवाहन केले आहे. "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी आपली शपथ पूर्ण करण्यासाठी तात्काळ राष्ट्रीय प्रसारमाध्यमावर जावे आणि संविधानाची सुरक्षा करावी आणि हे सर्व थांबवावे", असे जो बायडेन म्हणाले. याचबरोबर, कॅपिटल बिल्डिंगमध्ये जो गोंधळ आपण पाहिला आहे, ते आम्ही नाही आहोत. ही कायदा न मानणाऱ्या लोकांची खूप कमी संख्या आहे. हा देशद्रोह आहे, असे जो बायडेन यांनी सांगितले.
https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&ref_src=twsrc%5Etfw">#WATCH | I call on President Trump to go on national television now to fulfil his oath and defend the Constitution and demand an end to this siege: US President-Elect Joe Biden on US Capitol mob violence https://t.co/CEaChwBsdd">pic.twitter.com/CEaChwBsdd
— ANI (@ANI) https://twitter.com/ANI/status/1346930766123397120?ref_src=twsrc%5Etfw">January 6, 2021