औसा : शहरासह तालुक्यात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण केलेले बोअरही कोरडे पडू लागले आहेत़ पाण्यावर लाखो रूपये खर्च करूनही प्रतीक्षा करावी लागत आहे़ शहरासह ग्रामीण भागात सध्या बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला आहे तर कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केली जात आहे़तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ४४ गावांना ८१ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ २ टँकर सुरु असूनही आणखीन १२ टँकरची मागणी करण्यात येत आहे़ अधिग्रहण करण्यात आलेले बोेअर बंद पडत आहेत़ तापमानाने चाळीशी ओलांडल्याने प्रत्येकाच्या घशाला कोरड पडत आहे़ त्यामुळे प्रत्येक जण थंड पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत़ प्रवास करताना प्रत्येक जण रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमधून बाटलीबंद पाण्याची बॉटल विकत घेतात़ दहा रूपयांची बाटली पंधरा ते वीस रूपयांना विकली जात आहे़ कोणी तक्रार केलीच तर परवडली तर घ्या़़़असा प्रश्न केला जातो़ आता ग्रामीण भागातही पंधरा ते वीस लिटरचे जार मागविले जात आहेत़ शहरी भागातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही आता पिण्याचे पाणी जारमधील मागविले जात आहेत़चौकट़़़एका व्यापार्याने सांगितले की, फोन केल्यानंतर आठ ते दहा तास पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते़ एकुणच येणारा महिना तालुकावासियांसाठी कसा जाईल याचीच चिंता आता सतावत आहे़ ग्रामीण भागात आठ ते दहा तास वीजपुरवठा उपलब्ध असतो़ त्यामध्येच थंड झालेले पाणी विकावे लागते़ फ्रिज, वीज याचा विचार केला तर १५ ते २० रूपयाला पाणी विकावे लागत असल्याचे सांगण्यात आले़ शहरी भागातही हीच अवस्था आहे़ एका पाणी विक्री करणार्या कर्मचार्याने सांगितले की मागणी पूर्ण करताना काट्यावरची कसरत करावी लागते़
बाटलीबंद पाण्याचा वापर वाढला टंचाई वाढली : कुलिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट
By admin | Published: May 10, 2015 10:40 PM