नवी दिल्ली : देशातील विमानतळांवर प्रवेश मिळविण्यासाठी आता कोणत्याही ओळखपत्राची गरज भासणार नसून चेहरा ओळखण्याच्या प्रणालीद्वारे बायोमेट्रीक ओळख पटवून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारच्या डिजी यात्रा योजनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नागरी विमानोड्डान खात्याचे मंत्री सुरेश प्रभू यांनी तंत्रज्ञानाच्या पलीकडील पाऊल असे या निर्णयाची स्तुती केली आहे. ही योजना लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हवाई यात्रा करु इच्छिणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटविण्याची सोय ऐच्छिक असणार आहे. या सोईमुळे प्रवाशांना कोणतेही कागदपत्र न दाखविता हवाई प्रवास करता येणार आहे.