लखनौ - उत्तर प्रदेशमधील लोकं काय करतील याचा नेम नाही. येथील बुलंदशहर येथे काही शेतकरी वेगळाच प्रयोग करत आहेत. येथील बटाटा उत्पादक शेतकरी आपल्या पिकांमध्ये दारूचा शिडकाव करत आहेत. त्यामुळे पिकांची गुणवत्ता दर्जेदार बनते, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, येथील संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी हा दावा चुकीचा ठरवला आहे.
बुलंदशहर येथील शेतकऱ्यांकडून वेगळाच प्रयोग केला जात आहे. पिकांची गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी चक्क शेतात दारू शिंपडली जात आहे. शेतातील पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे. मात्र, या प्रयोगामुळे शेतीवर दूरगामी परिणाम होतील, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच या प्रयोगाचा कुठलाही फायदा शेतकऱ्यांना होणार नसून यास कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलंय. दरम्यान, किटकनाशकांपेक्षा दारूचा शिडकाव जास्तीच महाग आहे. तरीही, जास्त उत्पादनाची आशा ठेवत शेतकऱ्यांकडून विलक्षण प्रयोग केला जात आहे. मात्र, कृषी अधिकाऱ्यांकडून असा कुठलाही प्रयोग न करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.