ऑनलाइन लोकमतजैसलमेर, दि. 31 - उघड्यावर शौचास जाणं बंद करण्यासाठी एक अनोखी योजना आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दररोज नियमितपणे शौचालयात जाणा-या लोकांना दरमहा 2500 रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. बारमेर जिल्हाधिकारी सुधीर शर्मा यांनी दोन पंचायतींमध्ये ही योजना सुरू केली आहे. स्वच्छ भारत मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकाला शौचालयाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ग्रामीण विकास विभाग आणि जिल्हाधिका-यांच्या संयुक्त विद्यमाने बायतू आणि गिडा या पंचायतींसाठी ही योजना लागू केली आहे. जिल्हाधिका-यांनी या योजनेच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना लागू करण्यात आल्याची माहिती सुधीर शर्मा यांनी दिली आहे. योजना गावातल्या लोकांना शौचालय वापरण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.योजना सुरू करण्याच्या दरम्यान आठ कुटुंबीयांना 2500 रुपयांचा चेक सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत बायतू आणि गिडा पंचायतीतील 15000 कुटुंबीयांना या योजनेचा फायदा झाला आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास व्यापकतेने लवकरच दुस-या पंचायतीतही राबवण्यात येणार आहे.
शौचालय वापरा, 2500 रुपये मिळवा
By admin | Published: January 31, 2017 4:01 PM