कोलकता : आंध्र प्रदेशच्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातील अनेक गावे माकडाच्या धुमाकुळाने त्रासली होती. पिकांची नासधूस करणाऱ्या माकडांना पळविण्यासाठी गावकऱ्यांनी खऱ्याखुऱ्या वाघासारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील वाघांचा वापर केला. आणि खरोखरच त्यांची युक्ती उपयुक्त ठरली. या भागात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही माकडे येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ले करतात, मौल्यवान वस्तू पळवून घेऊन जातात. अनेकदा घरातही घुसतात. गावकऱ्यांनी नकली वाघाची कल्पना लढवली आणि ती यशस्वी झाली. वाघांची खेळणी ठिकठिकाणी ठेवल्यानंतर माकडांनी गावातून पळ काढला आहे. माकडांना हे नकली वाघ खरेच वाटले. आता गावकरी खुष असून माकडे पुन्हा परतणार नाहीत, अशी त्यांना आशा आहे. या भागात माकडांची संख्या खूप मोठी आहे. सगळ््यांनाच पकडणे शक्य नाही, असे वनाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. तामिळनाडूमध्ये २0१४ शेतकऱ्यांनी हत्तींना पळवून लावण्यासाठी अशाच प्रकारे खेळण्यातील वाघ वापरले होते. हे हत्ती अन्नाच्या शोधात शेतांत घुसून पिकांची नासधूस करीत होते. खेळण्यातले वाघ हत्तींना घाबरविण्यात अपयशी ठरले होते. मात्र, हत्तीसाठी ठेवलेल्या खेळण्यातील वाघांमुळे नारळ खाणारी माकडे पळून गेली होती. आंध्र प्रदेशातील प्रयोगामागे तामिळनाडूतील हा प्रयोगाची प्रेरणा असू शकेल.
माकडांना पळविण्यासाठी खेळण्यातील वाघांचा वापर
By admin | Published: January 16, 2017 5:06 AM