दिवाळीच्या सणामुळे गावाकडे जाणाऱ्यांची मोठी गर्दी रेल्वे आणि बस स्थानकावर होत आहे. तर, खासगी वाहतुकीचा पर्यायही निवडला जात आहे. रेल्वेचं आरक्षण मिळत नसल्याने खासगी वाहतुकीचा पर्याय निवडला जात असून खासगी वाहतूकदारांनी नेहमीप्रमाणे दरवाढ केल्याचं दिसून येतय. रेल्वेचं आरक्षण फुल्ल असल्याने तत्काल आरक्षणाचा एकमेव पर्याय प्रवाशांपुढे उरला आहे. मात्र, तिथेतही तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमीच असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय आणि नाराजी दिसून येते. मात्र, तत्काल तिकीट कन्फर्म होण्यासाठी काही ट्रीक्स वापरुन तुम्हाला तिकीट मिळवता येऊ शकते.
IRCTC मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर तुमचं अकाऊंट असल्यास तुम्हाला तत्काल तिकीट मिळवताना काही ट्रिक्स वापरुन तुमचं तिकीट कन्फर्म करता येईल. त्यामुळे, तुमचं तिकीट बुकींग आणखी सोपं आणि शक्यतो कन्फर्म होऊ शकेल.
IRCTC वेबसाईटवर तत्काल तिकीट बुक करताना वेबसाईटचा स्पीड स्लो होतो, किंवा बफरिंग होत असल्याने प्रवाशांची मोठी निराशा होते. त्यातच, युजर्सं किंवा प्रवाशांकडून तिकीटासंदर्भातील माहिती भरण्यापूर्वीच बुकींग फुल्ल होऊन जातं आणि तत्काल तिकीटाचा प्रयत्न अयशस्वी होतो. त्यामुळे, प्रवाशांनी तत्काल तिकीटाचे बुकींग करताना, IRCTC Tatkal Automation Tool चा वापर केल्यास प्रक्रिया सहज-सोपी होते.
IRCTC Tatkal Automation Tool ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्यामुळे, बुकींगसाठी लागणारा वेळ कमीत-कमी लागतो. तिकीट बुकींग सर्व्हीस लाईव्ह होताच, नाव, वय आणि प्रवासाची तारीख जलदगतीने भरण्यासाठी मदत करण्यास या टुल्सचा उपयोग होतो. त्यामुळे, तुमचं तिकीट कन्फर्म होण्यास मदत होते.
अशी करा प्रोसेस
क्रोम ब्राउजरमधून तुम्ही IRCTC Tatkal Automation Tool डाऊनलोड करा
त्यानंतर, IRCTC अकाउंट लॉग-इन करा
Tatkal टिकट बुक करण्यापूर्वीच या टूलद्वारे तारीख, पॅसेंजर डिटेल्स आणि वय सेव्ह करण्याची सुविधा देते.
तत्काल तिकीट बुकींग करताना फक्त लोड डाटा या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल, त्यामुळे डिटेल्स सेव्ह होतील.
त्यानंतर, तुम्ही लगेचच पेमेंट करु शकता आणि तुमचं तिकीट कन्फर्म होण्यास मदत होईल.