नवी दिल्ली - दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे सक्तीचे झाल्यानंतर आता याबाबतचा अजून एक नियम लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. दुचाकीस्वारांनी केवळ ब्रँडेड हॅल्मेट वापरावेत, तसेच या हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीबाबतचा नवा कायदा लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकली आहेत. नव्या नियमानुसार लोकल हॅल्मेट घालून दुचाकी चालवताना सापडल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. तसेच लोकल हॅल्मेटच्या उत्पादनावर दोन लाखांपर्यंतचा दंड आमि कारावासाची शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे. देशात विना हॅल्मेट किंवा लोकल हॅल्मेट परिधान करून दुचाकी चालवताना दररोज २८ लोकांचा मृत्यू होतो.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीस्वारांना सुरक्षित हॅ्ल्मेट पुरवण्यासाठी प्रथमच भारतीय सुरक्षा मानक ब्युरोच्या सुचीत समाविष्ट केले आहे. या अंतर्गत मंत्रालयाने ३० जुलैपर्यंत जारी केलेल्या अध्यादेशामध्ये संबंधितांकडून सल्ले आणि हरकती मागवल्या आहेत. आता ३० दिवसांनंतर याबाबतचा नवा नियम लागू केला जाईल. या कायद्यांतर्गत हॅल्मेट निर्माता कंपन्यांना हॅल्मेटची बाजारात विक्री करण्यापूर्वी बीएसआयकडून हे हॅल्मेट प्रमाणित करून घ्यावे लागतील. यामध्ये राज्य सरकारच्या प्रवर्तन विभागाला लोकल हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे अधिकार असतील.
विना हॅल्मेट किंवा लोकल हॅल्मेट प्रवास करताना आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नव्या मापदंडांनुसार हेल्मेटचे वजन दीड किलोवरू घटवून एक किलो २०० ग्रॅम करण्यात आले आहे. दरम्यान, गैर बीआयएस मानांकित हॅल्मेटचे उत्पादन आणि विक्री हा गुन्हा मानला जाईल. असे करणाऱ्या कंपनीला दोन लाखांपर्यंत दंड आणि कारावासाची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. तसेच अशा लोकल हॅल्मेटची आता निर्यात करता येणार नाही. बीएसआय लागू झाल्याने हॅल्मेटचा बॅच, ब्रँड आणि उत्पादनाची तारीख ग्राहकांना कळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल