कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मर्चंट चेंबर तिराहाजवळ गेल्या तीन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या मवाल्याला एसीपींनी पकडलं आणि पाच सेकंदांत पाच झणझणीत भरून दिल्या. एवढेच नाही, तर या मवाल्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करत कारागृहातही पाठवण्यात आले. यासंदर्भात बोलताना कोहना येथील रहिवासी असलेल्या पीडितेने सांगितले, की तो सातत्याने तिला त्रास देत होता. वडिलांनी त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र तो ऐकायला तयार नव्हता. यामुळे कर्नलगंजच्या एसीपींकडे तक्रार केली. यानंतर त्यांनी त्याला धडा शिकवला.
संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीने सांगितले, की ती सिव्हिल लाईन्स येथील महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे आणि तिचे वडील मजुरी करतात. या भागात राहणारा शादाब नावाचा मवाली तीला येता-जाता त्रास देत होता. यावर तिने वडिलांना सांगितले, यानंतर तिच्या वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही. मुलीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही, कोर्टात मुलीची बदनामी होईल या भीतीने आपली तक्रार करण्याची इच्छा नव्हती.
यावर संबंधित अल्पवयीन मुलीने हा संपूर्ण प्रकार एसीपी कर्नलगंज त्रिपुरारी पांडेय यांना सांगितला, यानंतर त्यांनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. रोजच्या प्रमाणेच गुरुवारी सकाळीही शादाब संबंधित पीडितेचा पाठलाग करत आला असता, एसीपी त्रिपुरारी पांडेय यांनी त्याला पकडले आणि पाच भरभरून थापडा लगाव धडा शिकवला. तसेच शांतता भंग केल्याप्रकरणी त्याला कारागृहात पाठवले.
एसीपी म्हणाले, विद्यार्थिनीचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यास घाबरत होते, यामुळे त्याच्यावर शांतता भंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मात्र, पुन्हा असे झाल्यास पोलीस स्वतः फिर्यादी बनून त्याच्या विरोधात तक्रार दाखल करेल.