शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

Asaduddin Owaisi : ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, कारंजा सापडला; असदुद्दीन ओवेसींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:45 AM

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे.

काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेदरम्यान शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लीम पक्षाने हिंदू पक्षाचा हा दावा फेटाळून लावला आहे. यातच आता, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी, ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात शिवलिंग नव्हे, तर कारंजा सापडा आहे. असे कारंजे प्रत्येक मशिदीत असतात, असा दावा केला आहे.

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा फेटाळत असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मशीद कमिटीने दिलेल्या माहितीनुसार,  मशिदीत शिव लिंग नाही, तर कारंजा होता. एवढेच नाही, तर प्रत्येक मशिदीत कारंजे असतात, असेही ते म्हणाले.

न्यायालयाचा आदेश 1991 मध्ये तयार झालेल्या कायद्याविरोधात -असदुद्दीन ओवेसी म्हणाले, न्यायालयाने नियुक्त केलेल्या कमिश्नरने शिवलिंग आढळून आल्याचा दावा न्यायालयात केलेला नाही. पण हिंदू पक्षाच्या वकिलाने न्यायालयात जाऊन, शिवलिंग आढळल्याचा दावा केला आहे. यानंतर न्यायालयाने संबंधित स्थळ सील करण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश 1991 च्या संसदेत तयार झालेल्या कायद्याविरुद्ध आहे. तसेच, जर मशिदीत शिवलिंग आढळून आले, तर ही बाब कमिश्नरने न्यायालयात सांगायला हवी होती.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, खालच्या न्यायालयाचा आदेश संसदेच्या 1991 च्या कायद्याचे उल्लंघन आहे. आपण 1991 चा आदेश मानणार नाही, असे पंतप्रधान मोदीनीं सांगून टाकावे. याशिवाय, केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवेसी म्हणाले, जर इतिहासावरच बोलायचे, तर 'बात निकली है, तो दूर तलक जाएगी.' बेरोजगारी, महागाई, वगैरेसाठी औरंगजेबच जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी नाहीत, औरंगजेबच आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनUttar Pradeshउत्तर प्रदेशMosqueमशिद