शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

UP Election 2022 : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद निवडणुकीच्या आखाड्यात; CM योगींना देणार थेट टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 1:42 PM

योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी गोरखपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक रिंगणात आहेत. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

योगी आदित्यनाथ हेही पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. योगी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी गोरखपूरमधून सलग 5 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला.

आझाद या लोकांविरोधात उमेदवार उतरवणार नाहीत -प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (पीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल सिंह यादव, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह काही लोकांविरोधात आपला पक्ष उमेदवार उभा करणार नाही, असे आझाद यांनी म्हटले आहे. तसेच, अखिलेश यादव यांनी निवडणूक लढवल्यास पक्ष त्यांच्यासमोरही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार नाही, असेही ते म्हणाले.

आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी मंगळवारीच म्हटले होते, की उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने 100 जागा दिल्या तरी मी त्यांच्याशी युती करणार नाही. आझाद ग्रेटर नोएडा येथे पत्रकार परिषदेत म्हणाले, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक लढवणार आहे आणि समाजवादी पक्षाशी चर्चा न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ