गजानन चोपडे मेरठ : रावणाची पत्नी मंदोदरीचे माहेर अर्थात बाहुबली रावणाची सासुरवाडी मेरठ. मंदोदरीने याच शहरातील बिल्वेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथांकडे पृथ्वीवरील सर्वाधिक बुद्धिमान आणि शक्तिशाली पतीची मनोकामना केली होती. मंदोदरीसोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर रावणाला या शहराने अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता रावणाच्या सासुरवाडीत रामाचीच चर्चा आहे.
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील मेरठ जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ वगळता इतर सहा जागांवर भाजपचाच कब्जा आहे. तो यंदाही कायम राहणार, असा दावा भाजप गोटातून केला जात आहे. मेरठ शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. बिल्वेश्वर मंदिरातच रावणाची मंदोदरीसोबत पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर दोघेही विवाह बंधनात अडकले. या शहराचे प्राचीन नाव मयदानव असे होते. मंदोदरीने सतत चाळीस दिवस या मंदिरात दीप प्रज्वलित करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते. असे असले तरी मागील अनेक वर्षांपासून या शहराला रामाने अर्थात भाजपने भुरळ घातली आहे. मेरठ शहर मतदारसंघ वगळता इतर सहा मतदारसंघांमध्ये भाजपचाच कब्जा आहे. मेरठ कँट, मेरठ दक्षिण, सिवालखास, सरधना, हस्तीनापूर, किठौरमध्ये भाजपचे आमदार असून, मेरठ शहर हा मतदारसंघ समाजवादी पक्षाकडे आहे. यंदाही तीच स्थिती सामान्य माणसाशी बोलताना दिसून आली. सपा पत्रपरिषदेवर मर्यादित, तर भाजप हायटेक, बसपा नावापुरतीच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी यांनी केलेला मेरठचा दौरा पत्रपरिषदेपुरताच मर्यादित राहिला.
लोक काय म्हणतातn खैरनगर मार्केट परिसरात निखिल शर्मा या तरुणाची भेट झाली. तो म्हणाला, आम्ही तसे काँग्रेसी. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भाजपने आपली पकड मजबूत केली आहे.n रामराज्याची घोषणा करणारा हा पक्ष यंदाही रामाच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहे. शहरातील हापूड रोड मार्केट आणि सदर भागातील नागरिकांचीही हीच प्रतिक्रिया आहे.
मायावतींची सावध भूमिकाबहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी गाझियाबाद येथे प्रचार रॅलीला संबोधित करताना सावध भूमिका घेतली. समाजवादी पक्षावर आगपाखड करताना त्यांनी भाजपवर मात्र सौम्य टीका केली. त्यांचे एकंदर भाषण अखिलेश यादव यांनाच टार्गेट करणारे होते.