UP Assembly Election 2022, Dates Announced: कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहेच. पण राजकीय दृष्ट्यादेखील हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ४०३ जागांसाठी एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. यात अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी सातही टप्प्यांसाठीचा निकाल जाहीर होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ १४ मार्च २०२२ रोजी संपणार आहे. उत्तर प्रदेशात ४०४ विधानसभा आणि विधान परिषदेत १०० सदस्य असतात. उत्तर प्रदेशात सध्या भाजपाचे सरकार आहे. तर मुख्य विरोधी पक्षात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचा समावेश आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०४ सदस्यांमध्ये ४०३ निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
२०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं ३१२ जागांवर घवघवीत यश प्राप्त करत सत्ता स्थापन केली होती. भाजपाला निवडणुकीत एकूण ३९.६७ टक्के मतं मिळाली होती. तर समाजवादी पक्षानं ४७ आणि बहुजन समाज पक्षानं १९ जागांवर विजय प्राप्त केला होता. काँग्रेसला केवळ सात जागा प्राप्त झाल्या होत्या.
असा आहे उत्तर प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम-
पहिला टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- १४ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- २१ जानेवारी २०२२अर्ज छाननी- २४ जानेवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- २७ जानेवारी २०२२मतदान- १० फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पा- अर्ज दाखल करण्याची तारीख- २१ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- २८ जानेवारी २०२२अर्ज छाननी- २९ जानेवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ३१ जानेवारी २०२२मतदान- १४ फेब्रुवारी २०२२
तिसरा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- २५ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- १ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- २ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ४ फेब्रुवारी २०२२मतदान- २० फेब्रुवारी २०२२
चौथा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- २७ जानेवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- ३ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- ४ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ७ फेब्रुवारी २०२२मतदान- २३ फेब्रुवारी २०२२
पाचवा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- १ फेब्रुवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- ८ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- ९ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- ११ फेब्रुवारी २०२२मतदान- २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- ४ फेब्रुवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- ११ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- १४ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- १६ फेब्रुवारी २०२२मतदान- ३ मार्च २०२२
सातवा टप्पा-अर्ज दाखल करण्याची तारीख- १० फेब्रुवारी २०२२अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- १७ फेब्रुवारी २०२२अर्ज छाननी- १८ फेब्रुवारी २०२२अर्ज मागे घेण्याची तारीख- २१ फेब्रुवारी २०२२मतदान- ७ मार्च २०२२
१० मार्च २०२२ रोजी मतमोजणी होईल.