- शरद गुप्ता नवी दिल्ली : लहान लहान पक्षांना एकत्र करून सत्ता आणण्याचा प्रयत्न करणारे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची आघाडी होऊ शकली नाही. अखिलेश यांनी त्यांच्यासाठी दोन जागा देण्याची तयारी दाखविली. मात्र, चंद्रशेखर यांना किमान १० जागा हव्या होत्या. नाराज झालेल्या चंद्रशेखर यांनी अखिलेश हे दलितविरोधी असल्याचा आरोप केला, तर भाजपला हरविण्यासाठी विरोधकांची आघाडी मजबूत करण्याची शपथही घेतली. अखिलेश यांनी त्यांना स्पष्ट केले की, ज्या ठिकाणी बसपा मजबूत स्थितीत आहे तिथे त्यांनी उमेदवार द्यावेत. या उमेदवारांचा खर्च करण्याची तयारीही त्यांनी दाखविली. मायावती आणि चंद्रशेखर आझाद हे दोघेही दलित समुदायातील जाटव समाजाचे आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, बिजनौर, बुलंदशहर आणि हाथरस जिल्ह्यात त्यांचा दबदबा आहे. पण, भाजप सोडून येत असलेल्या नेत्यांमुळे अखिलेश यांच्याकडे देण्यासाठी आता जागाच शिल्लक नाहीत.मतदान २० फेब्रुवारीला ठेवा -मुख्यमंत्री चन्नीचंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी अशी मागणी केली आहे की, मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी करावी. १६ रोजी श्री गुरु रविदास जयंती आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक उत्तर प्रदेशातील बनारसला जातात. पंजाबमध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या ३२ टक्के आहे. किसान मोर्चा याेगी व माेदी सरकारच्या विराेधात सभा घेणारपंतप्रधान नरेंद्र माेदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांच्या जनविराेधी व संवेदनहीन राज्य कारभाराची माहिती लाेकांना देण्यासाठी संयुक्त किसान माेर्चा निवडणूक काळात उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेणार आहे.
Uttar Pradesh Assembly Election: सपा-भीम आर्मी आघाडी झालीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:21 AM