शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

Uttar Pradesh Assembly Election: भाजप-जेडीयू बोलणी फिसकटली; यूपीत जेडीयू स्वबळावर लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 6:35 AM

भाजपचा प्रतिसाद नाही; आम्ही स्वबळावर लढू : त्यागी

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि जनता दलात (संयुक्त) जागा वाटपाची बोलणी शेवटच्या प्रयत्नांतही अपयशी ठरली. उत्तर प्रदेशमध्ये २००७ मध्ये भाजप व जनता दलाने (संयुक्त) निवडणूक एकत्र लढविली होती. ते लक्षात घेऊन भाजपने बिहारमध्ये राष्ट्रीय लाेकशाही आघाडीत (रालोओ) सहभागी असलेल्या आमच्या पक्षाला सामावून घ्यावे, अशी जनता दलाची (संयुक्त) इच्छा आहे. तेव्हा जनता दलाने (संयुक्त) २२ जागा लढवून २ जिंकल्या, तर भाजपने ४५. मायावतींनी सत्ता स्थापन केली होती.जनता दलाने (संयुक्त) आपले वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पोलाद मंत्री आरसीपी सिंह यांना भाजपसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी दिली होती. परंतु, वाटाघाटी निष्फळ ठरल्या आणि आम्हाला स्वबळावर लढावे लागू शकेल, असे जनता दलाने (संयुक्त) म्हटले. जनता दलाचे (संयुक्त) सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना ‘आम्ही उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५० जागा मागत आहोत आणि यावर चर्चा करण्याची इच्छा आहे. भाजपने विचार करून शक्तिशाली आघाडी करावी. परंतु, तसे काही दिसत नाही.” असे म्हटले. आर.सी.पी. सिंह हे भाजप आणि अमित शाह, राजनाथ सिंग, जे. पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान या वरिष्ठ नेत्यांच्या नियमित संपर्कात आहेत. परंतु, या क्षणी तरी काही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. जनता दलाला (संयुक्त) ५० पेक्षा कमी जागांवरही तडजोड करायची होती, असे त्यागी म्हणाले. भाजप उत्तर प्रदेशमधील नितीश कुमार यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद न देण्यामागील एक कारण हे बिहारमध्ये जनता दलाशी (संयुक्त) वाढते मतभेद हे आहे. हे मतभेद विधान परिषद निवडणुकीसाठी जागा वाटप, दारूबद्दलचे धोरण आणि इतर विषयांवर आहेत.अहंकार निर्माण झाला : भाजप उत्तर प्रदेशमध्ये आघाडी करण्यास का प्रतिसाद देत नाही, असे विचारल्यावर त्यागी म्हणाले, ‘स्वबळावर निवडणूक जिंकण्याएवढा अहंकार भाजपला निर्माण झाला आहे.’

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा