Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, पण...; मोदी-शहांची चिंता वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:27 PM2021-11-12T19:27:53+5:302021-11-12T19:28:25+5:30

Uttar Pradesh assembly election ABP C-Voter Survey: भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता; समाजवादी पक्ष जोरदार लढत देणार

Uttar Pradesh assembly election bjp might win election samajwadi party likely to take second position | Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, पण...; मोदी-शहांची चिंता वाढणार?

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, पण...; मोदी-शहांची चिंता वाढणार?

Next

लखनऊ/नवी दिल्ली: पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आहे. ती कायम ठेवण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटर सर्व्हेक्षण केलं आहे. 

एबीपी-सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी पाहता भाजपच्या जागा १०० नं कमी होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. त्यापैकी २१३ ते २२१ जागा भाजप जिंकू शकेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ३२५ जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या १०० जागा कमी होत असताना समाजवादी पक्षाच्या १०० जागा वाढतील असा अंदाज आहे. २०१७ मध्ये ४८ जागा जिंकणारा समाजवादी पक्ष यंदा १५२ ते १६० जागा जिंकेल असा अंदाज आहे.

बहुजन समाज पक्षाच्या कामगिरीत फारशी सुधारणा होणार नाही. पाच वर्षांपूर्वी १९ जागा जिंकणार बसप यंदाही १६ ते २० जागाच जिंकू शकेल, असं सर्व्हेतील आकडे सांगतात. प्रियंका गांधी जोर लावूनही काँग्रेसला उत्तर प्रदेशात अच्छे दिन येण्याची शक्यता कमीच आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ७ उमेदवार निवडून आले होते. यंदा हा आकडा ६ ते १० असू शकेल. 

गेल्या चार महिन्यांपासून होत असलेल्या सर्व्हेक्षणातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. भाजपच्या जागा कमी कमी होत असल्याचं गेल्या ४ सर्व्हेतील आकडे सांगतात. सप्टेंबरमधील सर्व्हे भाजपला २५९ ते २६७ जागा मिळतील असं सांगत होता. ऑक्टोबरमध्ये २४१ ते २४९, नोव्हेंबरमध्ये २१३ ते २२१ असे आकडे समोर आले. समाजवादी पक्षाचे आकडे मात्र वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये करण्यात आलेला सर्व्हे सपला १०९ ते ११७ जागा मिळतील असा अंदाज सांगत होता. आता हीच आकडेवारी १५२ ते १६० वर गेली आहे.

उत्तर प्रदेशात कोणाला किती टक्के मतदान?
भाजप- ४१ टक्के
समाजवादी पक्ष- ३१ टक्के
बसप- १५ टक्के
काँग्रेस- ९ टक्के
अन्य- ४ टक्के 

Web Title: Uttar Pradesh assembly election bjp might win election samajwadi party likely to take second position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.