- सुरेश भुसारीनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते माेठ्या प्रमाणावर भाजपला रामराम करत असल्याचा परिणाम शनिवारी जाहीर केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपच्या यादीवर दिसून आला. भाजपच्या १०७ उमेदवारांमध्ये तब्बल ४४ उमेदवार ओबीसी आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ गाेरखपूर शहर या मतदार संघातूनच निवडणूक लढतील, हे आज स्पष्ट झाले आहे. या यादीत १९ अनुसूचित जातीचे तर १० महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे. एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही.पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व महासचिव अरुण सिंग यांनी घाेषणा केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून आमदारांच्या गळतीचा परिणाम भाजपच्या यादीवर स्पष्टपणे दिसून आला. अर्ध्यापेक्षा अधिक विद्यमान आमदारांची नावे कापली जाणार, असा कयास लावला जात हाेता. परंतु, भाजपमध्ये गळती सुरू झाल्याने पक्षश्रेष्ठींनी ही टक्केवारी केवळ २०वर आणली. तसेच या यादीवर ओबीसी उमेदवारांची स्पष्ट छाप दिसून आली. दरम्यान, घाेषित केलेल्या यादीत गाेरखपूरमधून याेगी आदित्यनाथ यांचे नाव आहे. यामुळे मथुरामधून ते निवडणूक लढवतील, या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मथुरामधून विद्यमान आमदार श्रीकांत वर्मा यांनाच उमेदवारी दिली आहे. प्रयाेगराज जिल्ह्यातील सिराथू मतदार संघातून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद माैर्य यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.नाकारलेले उमेदवारभाजपने उमेदवारी कापलेल्यांमध्ये विनयकुमार कश्यप, हरीओम शर्मा, रामवीर सिंग, सत्यप्रकाश अग्रवाल, रमेशचंद्र ताेमर, कमलसिंग मलिक, विमला सिंग साेलंकी, विरेंद्र सिंग सिराेही, अनिता सिंग राजपूत, विरेंद्र सिंग, दलवीर सिंग या प्रमुखांचा समावेश आहे.
Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या यादीत ओबीसींना झुकते माप; पहिल्या यादीत १०७ जणांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:13 AM