- हरीश गुप्तानवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतून समाजवादी पार्टीशी (सपा) त्यांनी छुपा करार केला असावा, असे संकेत आहेत. २०१७ मधील प्रयोगानंतर आणि स्वतंत्रपणे लढल्याच्या अनुभवानंतर या दोन्ही पक्षांनी आपापल्या मार्गांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आखलेले धोरण आणि पक्षाने जाहीर केलेली उमेदवारांची पहिली यादी यात संगती दिसत नाही.भाजपमधून सपात नेते जाताना वाहिन्यांवरील वादविवादांत काँग्रेसचे प्रवक्ते काहीसे आनंदी दिसत होते. काँग्रेसच्या ट्विटर हँडलने एकापेक्षा जास्त ट्विट्समध्ये म्हटले की, १६ जण सोडून गेले असून, आणखी काही रांगेत उभे आहेत. हे सांगण्याचा आविर्भाव हा भाजपमधून लोक जणूकाही काँग्रेस पक्षात येत आहेत, असा होता. आपले स्वत:चे आमदार इमरान मसूद हेच सपात गेले आहेत याचाच विसर या प्रवक्त्यांना पडला. ललितेश त्रिपाठी हे काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) गेल्यावर त्यांचा निषेध पक्षाने केला नाही. सपाने ही जागा युतीमध्ये टीएमसीला दिली. भाजपमध्ये खिंडार पाडण्यात आपल्याला अपयश आले; परंतु सपा ते काम करीत आहे, याचाच काँग्रेसला दिलासा असेल. पक्षाचे नेते सपावर टीका करणे टाळत आहेत. काँग्रेसने १२५ तिकिटे दिली असून, त्यातील ब्राह्मणांना दिलेल्या २० जागांसह ४७ जागा या उच्चवर्णीयांना मिळाल्या आहेत.उमेदवार देणार नाहीपक्षाने २० मुस्लिमांनाही तिकिटे दिली असून, त्यातील बहुतेक एक अपवाद वगळता सारख्या नावांची आहेत. उल्लेखनीय म्हणजे बलात्कार पीडितेच्या आईच्या विरोधात सपा कदाचित उमेदवार देणार नाही.
Uttar Pradesh Assembly Election: काँग्रेस- सपाचा छुपा करार? सपावर टीका करणे टाळताहेत काँग्रेसचे नेते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 6:23 AM