नोएडा : भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार पंकज सिंह (Pankaj Singh) यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा सुमारे 1 लाख 80 हजारांच्या विक्रमी फरकाने जिंकली आहे. विधानसभा निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय आहे.
नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना 70.83 टक्के मते मिळाली आहेत. त्या तुलनेत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 16.84 टक्के, बसपाच्या उमेदवाराला 5.01 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 3.97 टक्के मते मिळाली आहेत.
नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज सिंह यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी, बसपचे कृपाराम शर्मा आणि काँग्रेसचे पंखुरी पाठक यांच्यात लढत होती. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली जागा असल्याचे म्हटले जाते.
पंकज सिंह हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्रदरम्यान, दिल्लीला लागून असलेली ही जागा सध्या भाजपाच्या ताब्यात असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह हे आमदार आहेत. 2017 मध्ये निवडून आलेले पंकज सिंह यांना या जागेवरून एकूण 1 लाख 62 हजार 417 मते मिळाली होती. या निवडणुकीत सपाचे सुनील चौधरी होते, त्यांना 58 हजार 401 मते मिळाली होती. 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे डॉ. महेश शर्मा यांनी ही जागा जिंकली होती. महेश शर्मा या जागेवर दोन वर्षे आमदार होते.