- शरद गुप्ता नवी दिल्ली : मुख्तार अन्सारी, डी.पी. यादव, बृजेश सिंह, हरिशंकर तिवारी आणि अतीक अहमद ही नावे उत्तर प्रदेशातच नाही तर महाराष्ट्रातही ओळखली जातात. राजकारणातील गुन्हेगारीकरणाची ही उदाहरणे आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सपा, भाजपसारख्या प्रमुख पक्षांनी या नेत्यांकडे पाठ फिरविली आहे. योगी सरकार या लोकांना तिकीट देऊन प्रतिमा खराब करू इच्छित नाही. अखिलेश यादव यांच्यावरही गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेही या नेत्यांपासून अंतर ठेवून आहेत. मुख्तार अन्सारी यांच्यावर दाऊद टोळीशी संबंध असल्याचा आरोप आहे. भाजपचे आमदार कृष्णानंद पांडेय, विहिंपचे कोषाध्यक्ष नंदकिशोर गुप्ता यांच्यासह अनेक हत्या, अपहरण आणि दरोड्यातील आरोपी मुख्तार सातत्याने आमदार झालेले आहेत. यांच्यावर राहिली कृपा आदित्यनाथ सरकारवर विरोधकांचा आरोप आहे की, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांवर यांची कृपा राहिलेली आहे. मग ते बृजेश सिंह असतील की, रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भय्या, धनंजय सिंह अथवा जितेंद्र सिंह बबलू. ७३ अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षणभुवनेश्वर : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून काम करण्यासाठी निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या आभासी प्रशिक्षण कार्यक्रमात ओडिशा केडरचे ७३ अधिकारी सहभागी झाले. या अधिकाऱ्यांना गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे केंद्रीय निरीक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
Uttar Pradesh Assembly Election: उत्तरप्रदेशात सपा, भाजपने गँगस्टरकडे फिरविली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 10:07 AM