शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

UP Assembly Election 2022 Results Live: जातीभेदाची टीका करणाऱ्यांना मोदींनी सुनावले, विजयानंतर जनतेचे आभार मानले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 6:23 AM

Uttar Pradesh Assembly elections Result 2022 Live : राष्ट्रीय राजकारणाची पुढील दिशा ठरवण्याची ताकद असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेसह पाच ...

11 Mar, 22 12:05 AM

अखिलेश यांच्या नातेवाईक अपर्ण यादव यांच्या घरी योगींचं औक्षण

10 Mar, 22 10:26 PM

कौशंबीच्या नवी मंडईतील मतदान निकाल केंद्रावर पोलिसांवर दगडफेक

10 Mar, 22 10:10 PM

औवेसींच्या एमआयएमला भोपळा, युपीत दारुण पराभव

10 Mar, 22 08:38 PM

जातीभेदावरुन भाजपला लक्ष्य करणाऱ्यांना मोदींनी सुनावले

10 Mar, 22 08:36 PM

कोरोना काळात आमचे प्रामाणिक प्रयत्न होते

कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून सध्याचा काळ गेलाय. या काळात ही निवडणूक झाली आहे. या परिस्थितीचा गंभीर परिणाम विश्वावर झालाय. मात्र, भारत सरकारने या काळात गरिबांसाठी, आर्थिक परिस्थितीवर जे निर्णय घेतले, त्यातून भारत वाचला. कारण, आमची नैतिकता जमिनीवर होते. आमचे प्रयत्न निष्ठा आणि नियतीवरच पुढे गेले, असे मोदींनी म्हटले. विकासाचं काम अधिक गतीवान झाला. 
 

10 Mar, 22 08:10 PM

२०२२ च्या निकालांने २०२४ च्या लोकसभेचे निकाल स्पष्ट केले

2019 मध्ये जेव्हा लोकसभेत आम्ही विजयी झालो, तेव्हा राजकीय विशेषज्ञांनी सांगितलं होतं, हा निकाल आधीच ठरला होता. कारण, 2017 चा निकालाने हे स्पष्ट केले होते. आता, 2022 च्या निकालावरुन 2024 चा निकाला स्पष्ट आहे, असेही ते म्हणतील, असेही मोदींनी म्हटले.  

10 Mar, 22 08:06 PM

मोदींनी सांगितला निकालातील स्त्री शक्तीचा महिमा

जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला. महिला,भगिनी आणि मातांचे मी मनापासून आभार मानतो. 

10 Mar, 22 07:26 PM

योगींच्या घराबाहेर जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी

10 Mar, 22 06:50 PM

युपीच्या विजयाचं श्रेय मोदी, जनता आणि कार्यकर्त्यांना

उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला - योगी आदित्यनाथ

10 Mar, 22 06:01 PM

योगी आदित्यनाथ यांचं जंगी सेलिब्रेशन

10 Mar, 22 05:17 PM

अखिलेश यादव यांचा विजय

अखिलेख यादव यांचा करहल मतदार संघातून विजय

10 Mar, 22 04:20 PM

दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात होणार सेलिब्रेशन

दिल्लीत आज संध्याकाळी भाजपाच्या मुख्यालयात भाजपाच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

10 Mar, 22 03:30 PM

भाजपमधून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य २१ हजार मतांनी पराभूत

भाजपातून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजिलनगरमधून २१ हजार मतांनी पराभूत झाले आहेत.

10 Mar, 22 03:05 PM

कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय विजय शक्य नव्हता; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशमधील विजय आपल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीशिवाय शक्य नव्हता. बुलडोझर हे माफिया आणि गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्याचे प्रतीक बनले आहे. आम्ही यूपीमध्ये पंतप्रधान मोदींच्या कल्याणकारी धोरणांची आणखी अंमलबजावणी करू, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

10 Mar, 22 02:52 PM

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुपारी ३ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात जाणार

दुपारी २.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यानथ दुपारी ३ वाजता भाजप प्रदेश कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

10 Mar, 22 02:45 PM

उत्तर प्रदेशतील गौतम बुद्धनगरमध्ये भाजपची तीनही जागांवर आघाडी

गौतम बुद्धनगरच्या तीनही जागांवर भाजप आघाडीवर आहे. नोएडा जागेवर भाजपचे पंकज सिंह १ लाख मतांनी आघाडीवर आहेत, तर दादरी जागेवर तेजपाल नगर ८० हजार मतांनी आघाडीवर आहेत. जेवरमध्ये भाजपचे धीरेंद्र सिंह ४० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 02:30 PM

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; बुलडोझर घेऊन कार्यालयात दाखल

10 Mar, 22 01:59 PM

भाजपच्या लखनऊ कार्यालयात अवतरला १.५ वर्षांचा योगी, हातात बुलडोझर, कपाळी टीळा

10 Mar, 22 01:40 PM

आम्हाला आधीच माहिती होते भाजपाचेच सरकार येणार : हेमा मालिनी



 

10 Mar, 22 01:35 PM

मुंबईत भाजपाने लाडू वळायला घेतले



 

10 Mar, 22 01:18 PM

सपा कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे; पक्षाच्या सूचना

उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीला आलेल्या कलांनुसार कमीत कमी १०० ठिकाणी ५०० हून कमी अंतराने समाजवादी पक्षाचे उमेदवार पिछाडीवर आहेत. कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

10 Mar, 22 12:51 PM

युपीत भाजप ३७ वर्षांचा रेकॉर्ड मोडणार; दुसऱ्यांदा बहुमताचे सरकार स्थापन करणार

उत्तर प्रदेशात ३७ वर्षांनंतर हे घडत आहे, जेव्हा पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार बनवले जात आहे. यूपीमध्ये २०१७ नंतर आता सन २०२२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार बनवत आहे. यापूर्वी १९८०, १९८५ मध्ये पूर्ण बहुमताने सरकारची पुनरावृत्ती झाली होती. त्यानंतर १९८० मध्ये ३०९ जागा, १९८५ मध्ये २६९ जागांसह काँग्रेस सरकारमध्ये आली.

10 Mar, 22 12:24 PM

युपीत सर्व ४०३ जागांचे कल हाती; भाजपचा धमाका, २६९ जागांवर मोठी आघाडी

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास चार तासांनंतर सर्व ४०३ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २६९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा १२३ जागा, बसप ०५, काँग्रेस ०३ आणि अन्य ३ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 12:18 PM

उत्तर प्रदेशमध्ये रायबरेली मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या स्थानी

गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या रायबरेली येथे काँग्रेस उमेदवाराला पिछाडीवर असून, तिसऱ्या स्थानी गेला आहे. 

10 Mar, 22 11:59 AM

युपीत चार तासांनंतर ४०१ जागांचे कल हाती; भाजपला २६९, सपाला १२१ ठिकाणी आघाडीवर

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास तीन तासांनंतर ४०१ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २६९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा १२१ जागा, बसप ०५, काँग्रेस ०३ आणि अन्य ३ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 11:38 AM

योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून १६ हजार मतांनी आघाडीवर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत योगी आदित्यनाथ १६ हजार ५६९, समाजवादी पक्षाच्या सुभाती शुक्लांना ४ हजार २९०, काँग्रेसच्या चेतना पांडे २२६ मते, बसपचे ख्वाजा शमसुद्दीन यांना १०४२ मते मिळाली आहेत.

10 Mar, 22 11:34 AM

उत्तर प्रदेशमधील अयोध्येत ५ पैकी ४ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एकूण ५ जागांपैकी भाजप चार जागांवर आघाडीवर आहे, तर सपा एका जागेवर आघाडीवर आहे. अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातून सपा उमेदवार अभय सिंह २६०० मतांनी आघाडीवर असून भाजपच्या उमेदवार आरती तिवारी मागे आहेत.

10 Mar, 22 11:17 AM

युपीत २४१ जागांच्या आघाडीसह भाजप आघाडीवर; सपाला १०७ जागा, ३८३ कल हाती

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास तीन तासांनंतर ३८३ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २४१ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा १०७ जागा, बसप ०४, काँग्रेस ०४, अपना दल ९, जनता दल युनायटेड ०१, जनसत्ता दल लोकतांत्रिक ०२, हमारा आम दल ७, सुहलदेव भारतीय समाज पार्टी ३ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 10:58 AM

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा धमाका; ४०३ जागांपैकी २३२ जागांवर उमेदवार आघाडीवर

10 Mar, 22 10:55 AM

वाराणसीमध्ये ८ पैकी ५ जागांवर भाजप आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणी सुरू असून, आता तीन तासांनंतर वाराणसीमधील ८ पैकी ५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 10:46 AM

उत्तर प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री असलेले केशव प्रसाद मौर्य सिराथू मतदारसंघातून आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यही आपल्या मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 10:43 AM

पहिल्या दोन तासांत पाच राज्यांमध्ये काय घडलं? वाचा १० मुद्दे...

पहिल्या कलांमध्ये भाजपानं मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पंजाबमध्ये 'आप'नं काँग्रेस अन् भाजपाला 'जोर का झटका' दिल्याचं दिसत आहे.

10 Mar, 22 10:39 AM

युपीत ३७८ जागांचे कल हाती; भाजपची २४६ जागांसह आघाडी कायम, सपाला १२० जागा

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास दोन तासांनंतर ३३६ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २४६ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा १२० जागा, बसप ०५, काँग्रेस ०४ आणि अन्य ०३ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 10:37 AM

उत्तर प्रदेशमध्ये सपा नेते अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आघाडीवर

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास दोन तासांनंतर ३७५ जागांसाठीचे कल हाती आले आहेत. सपा नेते अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर आतापर्यंतचे कल पाहता सपा ११९ जागांवर आघाडीवर आहे. 

10 Mar, 22 10:33 AM

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून आघाडीवर.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास दोन तासांनंतर ३७५ जागांसाठीचे कल हाती आले आहेत. योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 10:28 AM

सर्वांना सोबत घेऊन गेल्यानेच भाजप आघाडीवर; केशव प्रसाद मौर्य यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशमधील प्रत्येक घरात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्या योजना पोहोचल्या आहेत. योजनांचा फायदा समाजातील सर्व वर्गाला मिळाला आहे. यामुळेच मतदारांनी भाजपवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केली आहे.

10 Mar, 22 10:09 AM

सपा नेते शिवपाल सिंह यादव जसवंतनगर मतदारसंघात पिछाडीवर

समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले शिवपाल सिंह यादव जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार पिछाडीवर आहेत.

10 Mar, 22 10:04 AM

युपीत ३३६ जागांचे कल हाती; भाजप २२९ जागांसह आघाडीवर, सपाला ८८ जागा

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास दोन तासांनंतर ३३६ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २३६ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ८६ जागा, बसप ०४, काँग्रेस ०६ आणि अन्य ०३ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 09:50 AM

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; ३०० जागांचे कल हाती, सपाला धोबीपछाड

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, ३०० जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २११ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ७८ जागा, बसप ०४, काँग्रेस ४ आणि अन्य ०३ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 09:40 AM

युपीत भाजप १८४ तर सपा ७९ जागांवर पुढे; युपीत आतापर्यंत २७५ ठिकाणचे कल हाती

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २७६ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १८८ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ७८ जागा, बसप ०३, काँग्रेस ४ आणि अन्य ०२ वर आघाडीवर आहेत.

10 Mar, 22 09:37 AM

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने खाते उघडले; ३ ठिकाणी आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये जवळपास तासाभरानंतर काँग्रेसने खाते उघडले असून, तीन ठिकाणी आघाडी घेतली आहे.

10 Mar, 22 09:32 AM

युपीत २५० जागांचे कल हाती; भाजप १६९ जागांवर पुढे; सपा अद्याप खूप मागे

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २५२ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १६९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ७८ जागा, बसप, ०३, अन्य ०२ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही. 

10 Mar, 22 09:13 AM

उत्तर प्रदेशमध्ये २२० जागांचे कल हाती; भाजपची १४७ ठिकाणी आघाडी कायम; सपा पिछाडीवर

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २२० जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १४७ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६९ जागा, बसप, ०२, अन्य ०२ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही. 

10 Mar, 22 09:12 AM

उत्तर प्रदेशमध्ये मैनपुरी जागेवर भाजप आघाडीवर

उत्तर प्रदेशच्या मैनपुरी विधानसभेच्या जागेवर भाजप आघाडीवर आहे, तर सौरभ श्रीवास्तव वाराणसीच्या कँटमधून, अरविंद राजभर शिवपूरमधून मागे आहेत.

10 Mar, 22 09:06 AM

२०१ जागांचे कल हाती; भाजपचे शतक, १२८ जागांसह आघाडी, सपा मागे पडली

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, २०१ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १२८ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६९ जागा, बसप, ०२, अन्य ०२ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही. 

10 Mar, 22 09:04 AM

वक्त आ गया है अब फैसलो का; अखिलेश यादव यांचे सूचक ट्विट

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मतमोजणी सुरू झाल्यावर एक ट्विट केले असून, मतमोजणी केंद्रांवर सपाचे कार्यकर्ते सतर्क राहतील. मतमोजणी केंद्रांवरील अधिकारी वर्गाला आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा, असे म्हणत इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का, असे ट्विट केले आहे.

10 Mar, 22 08:59 AM

भाजप लोकशाहीचा नाश करतेय; सपा नेत्याचा आरोप

ईव्हीएममध्ये गैरव्यवहार झाला असून, भाजप लोकशाहीचा नाश करत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते नरेश उत्तम पटेल यांनी केला आहे.

10 Mar, 22 08:57 AM

१८० जागांचे कल हाती; भाजपचे शतक, १०९ जागांसह आघाडी, सपा मागे पडली

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, १८० जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप १०९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६८ जागा, बसप, ०२, अन्य ०१ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही. 

10 Mar, 22 08:51 AM

सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने, सपाची जोरदार मुसंडी; १५१ जागांवर मतमोजणी

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, १५१ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप ८४ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६३ जागा, बसप, ०२, अन्य ०१ वर आहेत. काँग्रेस पक्षाला अजूनही खाते उघडता आले नाही. 

10 Mar, 22 08:43 AM

उत्तर प्रदेशमध्ये १३७ जागांचे कल हाती; भाजप आघाडीवर, सपाची जोरदार टक्कर

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, १३७ जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप ७१ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ६३ जागा, बसप, ०२, अन्य ०१ वर आहेत. काँग्रेसला अद्याप खाते उघडता आले नाही.

10 Mar, 22 08:31 AM

उत्तर प्रदेशमध्ये ४०३ पैकी १०७ जागांचे कल हाती; भाजपची आघाडी कायम

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, १०० जागांसाठी कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप ६० जागांसह आघाडीवर आहे. तर सपा ४४ जागा, बसप, ०२, अन्य ०१ वर आहेत. काँग्रेसला अद्याप खाते उघडता आले नाही. 

10 Mar, 22 08:20 AM

उत्तर प्रदेशमधील ४०३ पैकी ४२ जागांचे कल हाती

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या एकूण ४०३ जागांपैकी ४२ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर असून, सपा दुसऱ्या स्थानी आहे.

10 Mar, 22 08:16 AM

उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात; भाजप आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली असून, भाजप १३, सपा ०९, बसप १ जागांवर आघाडी

10 Mar, 22 08:14 AM

जनता नाराज आहे, त्याचे परिणाम दिसून येतील: राकेश टिकैत

योगी सरकारवर जनता नाराज आहे, त्याचा परिणाम आजच्या मतमोजणीनंतर दिसून येईल, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली.

10 Mar, 22 08:02 AM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू

उत्तर प्रदेशच्या ४०३ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. 

10 Mar, 22 07:32 AM

भाजपाच बहुमताचे सरकार स्थापन करेल: ब्रिजेश पाठक



 

10 Mar, 22 07:04 AM

लखनऊमध्ये मतदान केंद्रांवर कर्मचारी येण्यास सुरुवात.



 

10 Mar, 22 06:42 AM

सकाळी ८ वाजता सुरू होणार मतमोजणी



 

10 Mar, 22 06:31 AM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ चा निकाल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ 
एकूण जागा: ४०३
बहुमत: २०२
 
भाजप: ३१२
सपा: ४७
बसपा:१९
अपना दल: ९
काँग्रेस: ७
अपक्ष: ३
एसबीएसपी: ४
राष्ट्रीय लोक दल :१
निशाद:१

10 Mar, 22 06:25 AM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ चा निकाल

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ 
एकूण जागा: ४०३
बहुमत: २०२

सपा: २२४
बसपा: ८०
भाजप: ४७
काँग्रेस: २८
राष्ट्रीय लोक दल :९
अपक्ष:६
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: १
पिस पार्टी ऑफ इंडिया: १
क्वामी एकता दल: १
अपना दल: १
इत्तेहाद ए मिलाद काउन्सिल: १

10 Mar, 22 06:27 AM

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस-सपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

उत्तर प्रदेशमध्ये पोलीसाच्या डोक्यावर सपाच्या कार्यकर्त्यांनी खूर्ची तोडली. मतमोजणी केंद्रावर हल्ला. पोलीस अधिकारी घटनास्थळी. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२