शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

स्कूटरवरुन जाणाऱ्या महिला शिक्षिकेला डम्परची धडक, ३ किमी फरफटत नेलं; डम्परला आग; जळून मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 10:11 PM

दिल्लीत स्कूटीवरुन जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीला कारनं धडक देत १२ किमी फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला असताना उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली आहे.

दिल्लीत स्कूटीवरुन जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीला कारनं धडक देत १२ किमी फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला असताना उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात बांदा येथे स्कूटीवरुन जाणाऱ्या महिला शिक्षकेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका डम्परनं महिला शिक्षिकेच्या स्कूटरला धडक दिली. त्यानंतर तिला जवळपास ३ किमी फरफटत नेलं. स्कूटरही डम्परमध्येच अडकली होती. थोड्यावेळानं डम्परमध्ये आग लागली आणि स्कूटर चालवणाऱ्या महिलेचा जळून मृत्यू झाला. 

माहिती मिळताच घटनास्थली पोहोचलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर क्रेनच्या मदतीने डंपरमध्ये अडकलेल्या महिलेची स्कूटी आणि तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुसरीकडे घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही लखनौची रहिवासी आहे. पतीच्या निधनानंतर तिला कोट्यातून शिक्षिकेची नोकरी मिळाली. डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध सुरू आहे. 

शॉर्ट सर्किटमुळे डम्परमध्ये आगलखनौ येथील रहिवासी असलेल्या पुष्पा देवी या स्कूटरनं प्रवास करत असता एका डम्परनं जोरदार धडक दिली. या घटनेत स्कूटी डंपरच्या आत घुसली. अपघातामुळे स्कूटीस्वार महिला शिक्षिकेला डम्पर चालक तीन किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेला. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे डम्परनं पेट घेतला. या घटनेत स्कूटीस्वार महिलाही जळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकमधून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. ही महिला बंडा कोणत्या कामासाठी गेली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे दिल्लीची कांजवाला घटना?३१ डिसेंबरच्या रात्री अंजली या २० वर्षीय तरुणीला बलेनो कारने धडक दिली आणि कारमध्ये अडकल्यामुळे तब्बल १२ किलोमीटरपर्यंत फरफटत गेली. १ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना कांजवाला परिसरातील रस्त्यावर एका मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच पोलिसांनी २४ तासांत बलेनो कारमधील ५ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली.

टॅग्स :Accidentअपघात