नवी दिल्ली - सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारने कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सरकारने लगेच निधीचे वितरण सुरू केले असून, राज्य सरकारांना जूनसाठी त्यांच्या करांतील हिश्श्यापोटी १,३९,७५० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. सर्वाधिक २५,०६९.८८ कोटी रुपयांचा निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. १४,०५६.१२ कोटी रुपयांच्या निधीसह बिहार दुसऱ्या स्थानी आहे. मध्य प्रदेशला १०,९७०.४४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने अधिकृतरित्या याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. मार्चमध्ये सादर करण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पात २०२४-२५ या वित्त वर्षासाठी राज्यांचा केंद्रीय करातील वाटा १२,१९,७८३ कोटी रुपये ठरविण्यात आला होता.
ताज्या वितरणानंतर आतापर्यंत २,७९,५०० कोटी रुपयांचा निधी राज्यांना वितरित करण्यात आला आहे. ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत त्यांना जादा प्रमाणात निधी दिल्याचे दिसते.
कोणाला किती निधी?उत्तर प्रदेश २५,०६९.८८बिहार १४,०५६.१२मध्य प्रदेश १०,९७०.४४पश्चिम बंगाल १०,५१३.४६महाराष्ट्र ८,८२८.०८राजस्थान ८,४२१.३८ओडिशा ६,३२७.९२तमिळनाडू ५,७००.४४आंध्र प्रदेश ५,६५५.७२कर्नाटक ५,०९६.७२गुजरात ४,८६०.४२छत्तीसगढ ४,७६१.३०झारखंड ४,६२१.५८आसाम ४,३७१.३८तेलंगणा २,९३७.५८केरळ २,६९०.२०पंजाब २,५२५.३२अरुणाचल प्रदेश २,४५५.४४उत्तराखंड १,५६२.४४हरियाणा १,५२७.४८हिमाचल प्रदेश १,१५९.९२मेघालय १,०७१.९०मणिपूर १,०००.६०त्रिपुरा ९८९.४४नागालँड ७९५.२०मिझोरम ६९८.७८ गोवा ५३९.४२ सिक्कीम ५४२.२२एकूण १,३९,७५०.९२ (आकडे कोटी रुपयांत)