ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 28 - उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील रेल्वे स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवानं हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही. दरम्यान, या स्फोटानंतर पोलिसांना परिसरातून कमी तीव्रेतचे आणखी तीन बॉम्ब आढळून आले आहेत. हे बॉम्ब रेल्वे ट्रॅकवर पेरण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संत कबीर नगर परिसरातील रेल्वे ट्रॅक उडवून मोठा घातपात घडवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. उत्तर प्रदेशातील फॉरेन्सिक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, 7 मार्च रोजी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. भोपाळहून उज्जैनला जाणाऱ्या रेल्वेमध्ये जबडीत स्टेशनजवळ आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. यात दहा जण जखमी झाले होत. यापूर्वी 2016मध्ये कानपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट झाला होता. यात इंदुर-पाटणा एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसल्याने 120 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.
#SpotVisuals One person injured after a low-intensity explosion near railway track in Sant Kabir Nagar, UP. Police have seized 3 crude bombs pic.twitter.com/awrX7AZxkj— ANI UP (@ANINewsUP) March 28, 2017
1 injured after a low-intensity explosion near railway track in Sant Kabir Nagar, UP. Police have seized 3 crude bombs.Forensic team at spot pic.twitter.com/X0tFPPmzF1— ANI UP (@ANINewsUP) March 28, 2017