उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर अतिक्रमण झाल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याचा आरोप आहे की, गुंडांनी आधी त्याच्या शेतालगतची जमीन घेतली. यानंतर त्याची जमीनही ताब्यात घेण्यात आली. याबाबत त्याने जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही सुनावणी झाली नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. ज्यांनी जमिनीवर कब्जा केला ते सर्व सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. जमिनीवर बेकायदेशीर प्लान्टिंग केलं जात असल्याचं देखील सांगितलं.
हे संपूर्ण प्रकरण मैनपुरी कोतवाली भागातील धाराऊ रोडचं आहे. या रस्त्यालगत कामता प्रसाद यांची शेतजमीन आहे. माझ्या जमिनीचे क्षेत्रफळ आधीच कमी असल्याचा आरोप कामता प्रसाद यांचा मुलगा उमेश याने केला आहे. तीन महिन्यांपूर्वी हरिशरण पचौरी नावाच्या व्यक्तीने आमचा छळ सुरू केला. मी शेत नांगरायला गेलो असता त्यांनी ट्रॅक्टर चालकाचा पाठलाग त्याला परत पाठवलं. मला शिवीगाळ केली आणि पोलिसांच्या संगनमताने मला पोलीस ठाण्यात बसवलं.
हरिशरण याने पचौरी पोलीस ठाणे गाठले. मला बबलू पांडेच्या घरी जावे लागेल असे सांगितले. माझ्या वडिलांना बबलूच्या घरी धमकावून संमतीपत्र लिहायला लावले आणि लेखापालाच्या संगनमताने माझ्या जमिनीचे मोजमाप करण्यात आले. बबलू पांडे हा मंत्री जयवीर सिंग यांचा खास माणूस असल्याचं उमेश सांगतो. तक्रार करूनही पोलिसांनी ऐकलं नाही. उलट पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सेंगर यांनी माझे वडील आणि भावाला निघून जा अन्यथा मी तुम्हाला जेलमध्ये टाकेन असं सांगितलं.
पोलिसांनी आमच्या घरातील महिलांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणलं. हे सर्व राजकारण्यांच्या दबावाखाली केले जात आहे. उमेशच्या भावाने सांगितलं की, जेव्हा आम्ही या लोकांना जेसीबी चालवण्यापासून रोखलं तेव्हा यांनी माझ्या अपंग भावाचं डोकं फो़डलं आणि पोलिसांनी आम्हालाच पोलीस ठाण्यात नेलं. त्याचवेळी आम्ही घटनास्थळी गेलो असता जमीन बळकावल्याचा आरोप असलेले हरिशरण पचौरी आम्हाला दिसले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.