लखनौ -उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने एक मोठा निर्णय घेत लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी केवळ व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात आले होते. (Uttar Pradesh Cases filed against people for lockdown violation will be cancelled)
योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल.
वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल
यापूर्वी, सरकारने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील सर्व व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर कायदामंत्री बृजेश पाठक यांनी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळाकरण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.
राज्य सरकारचे म्हणणे आहे, की कोविडसंदर्भातील खटल्यांमुळे लोकांना अनावश्यक त्रासाचा सामना करावा लागेल. आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे खटे मागे घेणे आवश्यक आहे.
सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...
खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य -कोरोना संक्रमण काळात लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील हजारो व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.