लखनौ : मंत्री, लोकप्रतिनिधी आदींसह राजकीय कार्यकर्त्यांवर वेळोवेळी दाखल झालेले सुमारे २० हजार खटले मागे घेण्यास उत्तर प्रदेशने कायदा केला असून, त्याचा फायदा स्वत: योगी आदित्यनाथ यांनाही मिळणार आहे. विधानसभेत यासंबंधीची विधेयके संमत झाल्यानंतर राज्यपाल राम नाईक यांनी त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले की, निदर्शने केल्याबद्दल आमदार, मंत्री यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयासमोर हजर न राहिल्याबद्दल त्यांच्यावर वॉरंटही जारी करण्यात आले होते. उत्तर प्रदेशमधील सर्वच पक्षांतील राजकीय कार्यकर्त्यांवर दाखल केलेले अशा प्रकारचे २० हजार खटले मागे घेण्यासाठी एक कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे. (वृत्तसंस्था)
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील खटले घेणार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:01 AM